झोपलेल्या दाम्पत्याची डोक्यात फावडं घालून हत्या, शिर्डीत खळबळ

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील कोऱ्हाळे शिवारात ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास दाम्पत्य झोपेत असताना त्यांच्या डोक्यात फावडे घालून हत्या करण्यात आली.

झोपलेल्या दाम्पत्याची डोक्यात फावडं घालून हत्या, शिर्डीत खळबळ
शिर्डीत दुहेरी हत्याकांडाने खळबळ

शिर्डी : झोपलेल्या दाम्पत्याची डोक्यात फावडं घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुहेरी हत्येच्या घटनेने शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (Ahmednagar Shirdi Couple Murder while sleeping)

दाम्पत्य झोपेत असताना डोक्यात प्रहार

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील कोऱ्हाळे शिवारात ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास दाम्पत्य झोपेत असताना त्यांच्या डोक्यात फावडे घालून हत्या करण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन तपास करत आहेत.

हत्येचं कारण अस्पष्ट, आरोपी पसार

शशिकांत चांगले ( वय 55 ) आणि सिंधू चांगले ( वय 50 ) असे हत्या झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. दाम्पत्याच्या हत्येने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस अधिक तपास करत आरोपींचा शोध घेत आहेत.

गोंदियात मजुरांची हत्या

दरम्यान, निर्माणाधीन इमारतीत दोन मजुरांची निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार कालच उघडकीस आला होता. गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी भागात ही घटना घडली. मजूर झोपेत असतानाच त्यांचा जीव घेण्यात आला. हत्येनंतर त्यांच्यासोबत राहणारा मजूर पसार झाला.

झोपेत हत्या, आरोपी पसार

दोन्ही मजूर हे मूळ उतर प्रदेशमधील होते. अमन आणि निरंजन अशी मयत मजुरांची नावं आहेत. तर आरोपी बलवान दोघांची हत्या करुन पसार झाला. गुरुवारी रात्री या नवनिर्मित इमारतीत चार मजूर झोपले होते. यापैकी दोघांची झोपेतच निर्घृण हत्या करण्यात आली. एक मजूर घटनास्थळावरुन पसार झालेला आहे, तर दुसऱ्या मजुराने याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली.

संबंधित बातम्या : 

नव्या इमारतीत झोपलेल्या दोघा मजुरांची हत्या, आरोपी मजूर पसार

नवी मुंबईत तिघांनी बॉसला घरात घुसून संपवलं, मैदानात बसून खोट्या जबानीचंही प्लॅनिंग

(Ahmednagar Shirdi Couple Murder while sleeping)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI