AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हायचं होतं डॉन, पण एन्काऊंटरच्या भीतीने पोलिसांपुढे लोटांगण, अट्टल गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या

संजयवर आत्तापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे 9 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. (Ambernath police arrest one criminal)

व्हायचं होतं डॉन, पण एन्काऊंटरच्या भीतीने पोलिसांपुढे लोटांगण, अट्टल गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या
Ambernath police arrest one criminal
| Updated on: Mar 02, 2021 | 7:34 PM
Share

अंबरनाथ : त्याला मुंबईचा डॉन व्हायचं होतं. त्यादृष्टीने त्याची वाटचालही सुरू होती, पण अचानक पोलिसांना तो घरी येणार असल्याची माहिती मिळते. अन् पोलीस फिल्मी स्टाईलने त्याला बेड्या ठोकतात. पण तो मात्र आपला एन्काऊंटर होईल, या भीतीनं पोलिसांपुढे अक्षरशः लोटांगण घालतो. एखाद्या चित्रपटात शोभावा, असा हा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. (Ambernath police arrest one criminal)

चंद्रशेखर बिराजदार उर्फ संजय पाटील असे या अट्टल गुन्हेगाराचं नाव आहे. हा अंबरनाथच्या सोमेश्वर मंदिर परिसरात दादागिरी करुन नंतर डॉन होण्याची स्वप्न पाहू लागला होता. संजयवर आत्तापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे 9 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

सातत्याने पोलिसांना गुंगारा

गेल्यावर्षी 9 सप्टेंबरला संजय पाटील त्याच्याच परिसरात घर बांधत असलेल्या एका रहिवाशाला धमकावले होते. माझ्या परवानगीशिवाय बांधकाम कसं केलं? असं विचारत त्याने मारहाण केली होती. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र डॉन होण्याची स्वप्न पाहत असलेला संजय सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता. (Ambernath police arrest one criminal)

अखेर 24 फेब्रुवारीला तो त्याच्या घराच्या परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मात्र दोनदा पोलिसांचा सापळा चुकला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी संजयला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बाईकवरून पळून जाऊ लागला. पण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पोलिसांनी सापळा रचलेला असल्यानं तो पोलिसांच्या हाती लागला.

एन्काऊंटर करतील या भीतीने पोलिसांच्या पाया पडला

पोलिसांनी अक्षरशः फिल्मी स्टाईलने पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर झडप घालून त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे परदेशी बनावटीची पिस्तूल आणि चार गोळ्या पोलिसांना आढळून आल्या. यावेळी डॉन होण्याची स्वप्न पाहणारा संजय पोलीस आपला एन्काउंटर करतील, या भीतीने अक्षरशः पोलिसांच्या पाया पडला.

तब्बल वर्षभरापासून त्याच्या मागावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी त्याला पोलीस ठाण्यात आणलं. त्याला अटक करून कोर्टात सादर करण्यात आलं. संजय पाटील यांच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. तसेच अंबरनाथ शहरातही त्याने अनेकांना धमक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तो मोकाट फिरत असल्यानं त्याच्या भीतीने अद्याप कुणीही पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. मात्र आता त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने ज्यांना ज्यांना त्रास दिला असेल, त्यांनी समोर येऊन न घाबरता तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. (Ambernath police arrest one criminal)

संबंधित बातम्या : 

भारताचा शेजारी कारगिल 2 च्या तयारीत? युद्धाची भाषा करत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी

Video : ‘आधी App बंद पाडला, आता वॅक्सिनेशन सेंटर बिन माय बापाचे’, निरुपमांचा राज्य सरकारवरच संशय

Pooja Chavan case | पूजा चव्हाण प्रकरणात नवा ट्विस्ट, वडिलांची चुलत आजीविरोधात पोलिसात तक्रार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.