धक्कादायक ! दोन वर्षीय बालकाच्या पोटावर लोखंडी रॉडने चटके, पोटाची चाळणी झाल्याने शेवटी मृत्यू

अशिक्षितपणा आणि अंधश्रद्धेमुळे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात एका दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. (amravati melghat superstition child died)

धक्कादायक ! दोन वर्षीय बालकाच्या पोटावर लोखंडी रॉडने चटके, पोटाची चाळणी झाल्याने शेवटी मृत्यू
CHILD DEATH

अमरावती : अशिक्षितपणा आणि अंधश्रद्धेमुळे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात एका दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. आजारी असल्याने बाळाच्या आजीने त्याच्या पोटावर लोखंडी रॉडने चटके दिले होते. हा प्रकार घडल्यानंतर बालकाची प्रकृती जास्तच बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा आज (6 जून) मृत्यू झाला. मेळघाटातील खटकाली या गावात हा प्रकार घडला. (Amravati Melghat Superstition two year child died after the shock of electric rod)

नेमका प्रकार काय ?

चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील एक 2 वर्षीय बालक आठवडाभरापासून आजारी होता. परतवाडा परिसरात आईवडील कामानिमीत्ताने असताना त्याला किरकोळ आजाराने ग्रासले. याच कारणामुळे सुरुवातीला त्याच्यावर धामणगाव येथील एका खासगी डॉक्टरमार्फत औषधोपचार करण्यात आला. त्या उपचारास बालकाने प्रतिसाद न दिल्याने त्याच्या आजीने त्याला भोंदूबाबाकडे नेले. या भोंदूबाबाने कोवळ्या निरागस बालकाच्या पोटावर डम्मा, डागण्या दिल्या. या प्रकारामुळे या दोन वर्षीय बालकाच्या पोटाची चाळणी झाली.

प्रकृती खालावल्यामुळे बालकाचा मृत्यू

त्यानंतर या बालकावर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे या बालकाचा आज (6 जून) मृत्यू झाला.

यशोमती ठाकूर यांचे कारवाईचे आदेश

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन 5 जून रोजी बालकाच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर त्यांनी बालकाच्या आई-वडिलाचीसुद्धा भेट घेतली होती. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मेळघाटात जनजागृती करण्याचे तसेच भोंदूबाबावर पोलीस कारवाई करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले होते.

इतर बातम्या :

‘थांबलास तर कोयता आणि पळालास तर गोळी, नाक्यावर फक्त आबांची टोळी’ व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवर हवा करणारे जेरबंद

VIDEO | वाळू तपासणी पथकातील महिला तलाठ्यावर भाजप नगरसेवकाचा हल्ला

वृद्ध महिलेची सून आणि नातवाकडून हत्या, नैसर्गिक मृत्यू भासवण्याचा प्रयत्न फसला

(Amravati Melghat Superstition two year child died after the shock of electric rod)