छोट्या भावाच्या अनैतिक संबंधांची मोठ्या भावाने चुकवली किंमत, जे घडलं ते खूप भयानक
विवाहित महिलेसोबत होते प्रेमसंबंध. अशा नात्याचा शेवट खूप भयानक असतो. त्याचे गंभीर परिणाम कुटुंबावर होतात. विवाहबाह्य संबंधांचा फक्त दोन व्यक्ती नाही, कुटुंबावर परिणाम होतो.

Crime News : विवाहबाह्य संबंधांचे अनेकदा गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्याची मोठी किंमत चुकवावी लागते. अशा अनैतिक नात्यातून राग, द्वेष, चीड निर्माण होते. अनेकदा शाब्दीक वादावादीच पर्यावसन एखाद्याला जीवानिशी संपवण्यामध्ये होतं. अशीच एक धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडलीय. जिथे छोट्या भावाच्या विवाहबाह्य संबंधांची किंमत मोठ्या भावाला चुकवावी लागली आहे. आंध प्रदेशच्या चित्तूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
नागाराजू असं मृत व्यक्तीच नाव आहे. त्याचा लहान भाऊ पुरुषोत्तम आणि संबंधित महिला कोनासीमाच्या रामचंद्रपूरम मंडलमध्ये राहतात. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.
वाद मिटवण्यासाठी बोलावलेल
महिलेच लग्न झालं होतं. तिचे पुरुषोत्तम बरोबर प्रेमसंबंध होते. महिलेच्या कुटुंबियांच्या या संबंधांना विरोध होता. त्यांनी पुरुषोत्तमचा मोठा भाऊ नागाराजूला हे सर्व थांबवून वाद मिटवण्यासाठी बोलावल होतं.
गाडीमध्येच हात-पाय बांधले
महिलेचे कुटुंबीय आणि नागाराजू गाडीमधून अज्ज्ञात स्थळी गेले होते. तिथे नागाराजूला मारहाण करण्यात आली. महिलेच्या कुटुंबीयांनी गाडीमध्येच नागाराजूचे हात-पाय बांधले. गाडीवर पेट्रोल ओतलं व आग लावली.
कार दरीत ढकलली
पुरावे मिटवण्यासाठी महिलेच्या कुटुंबीयांनी ती कार दरीत ढकलून देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. गाडी खाली दरीत कोसळत असताना एका मोठ्या दगडामुळे कार खाली कोसळली नाही. त्या मार्गावरुन जाणाऱ्या अन्य कार चालकांनी नागाराजू त्या गाडीमध्ये असल्याच पाहिलं. त्यांनी पोलिसांना सांगून प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. पण गंभीररित्या भाजल्यामुळे नागाराजूला मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर नागाराजूचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. पोलीस अन्य आरोपींच्या शोधात आहेत.
