देशी पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह एका आरोपीला गोरेगावमध्ये अटक, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

देशी पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह एका आरोपीला गोरेगावमध्ये अटक, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
देशी पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह एका आरोपीला गोरेगावमध्ये अटक

गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय मॉल जवळ एक इसम देशी पिस्तुल आणि जिवंत काडतूस घेऊन येणार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देवर्षी यांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे देवर्षी हे एटीएस पथकासह शनिवारी रात्रीपासून ओबेरॉय मॉलजवळ सापळा रचून बसले होते.

ब्रिजभान जैस्वार

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 16, 2022 | 6:27 PM

मुंबई : देशी बनावटीची पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह एका आरोपीला दहशतवादी विरोधी पथकाने गोरेगावमध्ये अटक केली आहे. नरेंद्र जवाहर सिंग(25) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो भुलेश्वर येथीस रहिवासी आहे. आरोपीकडून एक पिस्तुल, तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली असून याची बाजारात किंमत एक लाख एक हजार रुपये आहे.

एक देशी पिस्तुल व 3 जिवंत काडतूसं जप्त

गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय मॉल जवळ एक इसम देशी पिस्तुल आणि जिवंत काडतूस घेऊन येणार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देवर्षी यांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे देवर्षी हे एटीएस पथकासह शनिवारी रात्रीपासून ओबेरॉय मॉलजवळ सापळा रचून बसले होते. रविवारी सकाळी साधारण 8.30 च्या सुमारास नमूद ठिकाणी एक इसम संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. या इसमाच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्याने पोलीस त्याच्या दिशेने चालले होते. मात्र आरोपीला पोलिसांची चाहूल लागल्याने तो ओबेरॉय मॉलकडून प्रवाशी इंडस्ट्रियल इस्टेटच्या दिशेने पळून जाऊ लागला व लोकांच्या गर्दीत मिसळून गेला.

मोठ्या शिताफीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या

आरोपीकडे लोडेड पिस्तुल असल्याने लोकांची सुरक्षा संभाळून त्यास शिताफीने व कौशल्याने कमीत कमी बाळाचा वापर करून ताब्यात घेण्यात आले. आरोपीची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तुल व तीन जिवंत राउंड (किंमत अंदाजे एक लाख एक हजार रुपये) मिळून आले. त्यास पोलीस ठाण्यास आणून त्याच्यावर कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा सह कलम 37 (1) (अ) 135 म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी पथक अधिकारी पोउनि. देवर्षी व पो.ना. दळवी, पो.शि. जाधव, पो.शि. शेख यांनी ही कारवाई केली. (Anti-terror squad arrests accused in Goregaon with indigenous pistols and live cartridges)

इतर बातम्या

Sangli : सांगलीत आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्य बहिष्कृत, नंदीवाले समाजाच्या सहा जात पंचांविरुद्ध गुन्हे दाखल

Kalyan : कल्याणमध्ये वीज बिल कमी करण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणारा भामटा गजाआड

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें