वृद्ध महिला बँकेच्या बाहेर येताच जोरजोरात ओरडायला लागली, सीसीटीव्ही पाहाताच पोलीस हादरले
एका वृद्ध महिलेसोबत बँकेबाहेर एक धक्कादायक घटना घडली आहे, सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून, पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.

वृंदावनला मोठं धार्मिक महत्त्व आहे. दररोज लाखो भाविक दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेनं वृंदावनाला येतात. अशा पवित्र ठिकाणी देखील गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहेत. एका वृद्ध महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एक वृद्ध महिला मोठ्या आनंदात तिचे आलेले पेन्शनचे पैसे बँकेतून काढण्यासाठी बँकेत पोहोचली. तिने पैसे काढून ते आपल्या हातामध्ये असलेल्या पर्समध्ये ठेवले मात्र बँकेच्या बाहेर निघताच तिला मोठा धक्का बसला. ती जोर-जोरात ओरडायला लागली कारण तिचे पैसे चोरी झाले होते.
हा धक्कादायक प्रकार रामकृष्ण मिशन स्थित स्टेट बँकेच्या जवळ घडला आहे. ही महिला आपल्या पेन्शनचे पैसे काढण्यासाठी बँकेत पोहचली, तीन बँकेतून पंधरा हजार रुपये काढून आपल्या पर्समध्ये ठेवले, ती बँकेच्या बाहेर आली. मात्र तीने जेव्हा पैसे काढले तेव्हापासूनच दोन चोर महिलांची तिच्यावर नजर होती. जशी ही महिला बाहेर आली, तशी मोठ्या शिताफीनं या महिलांनी तिची पर्स लांबवली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या महिला चोरी करताना दिसत आहेत. या घटनेचा या वृद्ध महिलेला मोठा धक्का बसला. पैसे चोरी झाल्याचं लक्षात येताच ही महिला जोरजोरात ओरडायला लागली.
समोर आलेल्या माहितीनुसार पुष्पलता असं या 75 वर्षीय महिलेचं नाव आहे. ती गौरा नगर कॉलनीमधील रहिवासी आहे. आपल्या पेन्शनचे पैसे काढण्यासाठी ही महिला बँकेत गेली होती. तिने बँकेतून 15 हजार रुपये काढले, मात्र तिच्यावर पैसे काढतानाच दोन महिलांनी पाळत ठेवली. ही महिला बँकेच्या बाहेर येताच अचानक ओरडायला लागली, कारण ती जेव्हा बँकेच्या बाहेर आली तेव्हा तिचे पैसे गायब झाले होते. या दोन महिलांनी तिची पर्स लांबवली होती. ही सर्व घटना सीटीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
