Mumbai : विमानाने आकाशात उड्डाण घेताच त्याने असं काही केलं की… बांगलादेशी नागरिकाला अटक?; एअर होस्टेस का धस्तावल्या ?
विमान हवेत असतानाच त्या प्रवाशाने असं किळसवाणं वर्तन केलं की एअर होस्टेस घाबरल्या. प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनाची ही या (2023) वर्षातील तब्बल १२ वी घटना आहे.

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या अनेक घटना कानावर पडल्या आहेत. असेच एक नवे पण अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मस्कतहून मुंबईला जाणाऱ्या विस्तारा विमानात (during flight) झालेल्या एका त्रासदायक घटनेत, एका 30 वर्षीय बांगलादेशी व्यक्तीने एअर होस्टेस सोबत (air hostess) गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर जवळजवळ संपूर्ण भरलेल्या फ्लाइटमध्ये त्याने किळसवाणी कृती करत हस्तमैथून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटनाही घडली आहे. मोहम्मद दुलाल असे आरोपीचे नाव असून विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
गुरुवारी पहाटे 4 वाजून 25 मिनिटांनी फ्लाइटचे लँडिंग होणार होते, त्याच्या अर्धा तास आधीच ही घटना घडली. आरोपी दुलाल हा ढाक्याला जाणार होता, त्यासाठी कनेक्टिंग फ्लाइटमध्ये चढण्यासाठी जात असतानाच त्याला अटक करून सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.विमान प्रवासादरम्यान प्रवाशांनी अशा प्रकारे गैरवर्तन केल्याची ही या (2023) वर्षातील तब्बल १२ वी घटना आहे.
अटकेनंतर, आरोपी दुलालला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र आपला अशील हा मानसिक विकाराने ग्रस्त असून त्याला इंग्रजी व हिंदी समजण्यास त्रास होतो, असे त्याच्या वकिलांनी बचावार्थ सांगितले. त्याच्या मानसिक विकारामुळे आणि मर्यादित भाषेच्या आकलनामुळे आरोपीला खोट्या आरोपांमध्ये गोवण्यात आल्याचा दावाही वकिलांनी केला आहे. मात्र, न्यायालयाने आरोपी दुलाल शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
फ्लाइट अटेंडंटने केली तक्रार
22 वर्षीय फ्लाइट अटेंडंटने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी दुलाला याला अटक करण्यात आली होती.विमान प्रवासादरम्यान आपण इतर प्रवाशांकडील फूड ट्रे गोळा करत असतानाच आरोपीने आपल्याकडे पाहून गैरवर्तन केले तसेच चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला, असे त्या तरूणीने तक्रारीत नमूद केले होते. मात्र फ्लाइट सुपरवायझर आणि इतर प्रवाशांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही आरोपीने त्याचे गैरवर्तन सुरूच ठेवले, असेही तक्रारीत लिहीण्यात आले होते.
“आरोपी हा सीट क्रमांक 19-ई येथे बसला होता, त्याच्याकडून जेवणाचा ट्रे घेतल्यानंतर, मी ट्रॉली पुढे ढकलत होते,तेव्हा आरोपी अचानक त्याच्या सीटवरून उठला आणि ट्रॉलीसमोर येऊन उभा राहिला. त्याने अचानक मला मिठी मारली आणि माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, ” असे तरूणीने तिच्या तक्रारीत लिहील आहे.
पुढे जाण्यासाठी ढकलले… आरोपीने त्याच्या सीटवरून उडी मारली आणि एका प्रवाशाला ट्रॉलीसमोर उभे केले. अचानक त्याने मला मिठी मारली आणि माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला धक्का बसला,” टाईम ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार तक्रारीत वाचले. त्यानंतर पीडित तरूणीनेतिच्या पुरुष सहकाऱ्याला तिच्या मदतीसाठी बोलावले आणि त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने त्यांनी दुलाल याला ताब्यात घेतले.
