शेतकरी महिलेची पाच जणांकडून छेड, कुटुंबालाही मारहाण, बीडमध्ये संतापजनक प्रकार

शेतकरी महिलेची पाच जणांकडून छेड, कुटुंबालाही मारहाण, बीडमध्ये संतापजनक प्रकार
बीडमध्ये शेतकरी कुटुंबाला मारहाण

शेतात काम करत असलेल्या एका महिलेची छेड काढण्यात आली. पीडित महिलेने जाब विचारताच पाच जणांना मिळून पीडितेसह तिच्या कुटुंबियांना अमानुष मारहाण केली.

महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 13, 2021 | 10:30 AM

बीड : शेतकरी महिलेची छेड काढल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पीडितेच्या छेडछाडीनंतर तिच्या कुटुंबालाही अमानुष मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

शेतात काम करत असलेल्या एका महिलेची छेड काढण्यात आली. पीडित महिलेने जाब विचारताच पाच जणांना मिळून पीडितेसह तिच्या कुटुंबियांना अमानुष मारहाण केली. ही घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे घडली आहे.

विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा

पाच नराधमांनी केलेल्या मारहाणीत पीडितेसह तिचं कुटुंब गंभीर जखमी झालं आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाचही आरोपी अद्याप फरार आहेत.

औरंगाबादेतही शेतकरी कुटुंबाला मारहाण

याआधी, बांधाच्या वादावरुन शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील हातनूर गावात घडला होता. नारायण काळे आणि त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

ठिबक सिंचनाचे पाईप उपसून कुटुंबावर फेकत मारहाण करण्यात आली होती. पुरुषांसह महिलांनाही बेदम मारहाण केल्याचे कॅमेरात कैद झाले होते. काही जणांना फरपटत नेल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत होते.

संबंधित बातम्या :

VIDEO | औरंगाबादेत शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण, पुरुषांसह महिलांनाही चोप

VIDEO | शेतीच्या वादातून राडा, दोन गटात तुफान हाणामारी, लाठ्या-काठ्यांसह दगड-विटांनी मारहाण

औरंगाबादमध्ये जमिनीचा वाद, होमगार्ड महिलेला नग्न करुन मारहाण

(Beed Farmer Lady Molestation family beaten up by five men)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें