Bidisha de Majumdar | 21 वर्षीय बंगाली अभिनेत्रीची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास!

Bidisha de Majumdar | 21 वर्षीय बंगाली अभिनेत्रीची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास!

बुधवारी तिचा मृतदेह फ्लॅटवर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, त्यानंतर संपूर्ण बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. बिदिशा एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती. त्याच फ्लॅटमध्ये मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला आहे. दरवाजा आतून बंद असल्याने पोलीसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 26, 2022 | 1:53 PM

मुंबई : सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 21 वर्षीय मॉडेल आणि बंगाली अभिनेत्री बिदिशा डे मजुमदार (Bidisha de Majumdar) हिने आत्महत्या करत आयुष्याचा शेवट केला आहे. यामुळे संपूर्ण बंगाली इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगाली मनोरंजन (Entertainment) क्षेत्रामध्ये 21 वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री बिदिशा डे मजुमदार हिने आत्महत्या (Suicide) केली. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 21 वर्षीय बंगाली मॉडेल आणि अभिनेत्री बिदिशाने तिच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे.

मृतदेह फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत

बुधवारी तिचा मृतदेह फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, त्यानंतर संपूर्ण बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. बिदिशा एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती. त्याच फ्लॅटमध्ये मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला आहे. दरवाजा आतून बंद असल्याने पोलीसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. चार महिन्यांपूर्वीच बिदिशा या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आली होती. पोलिसांना फ्लॅटमधून एक सुसाईड नोटही सापडली आहे.

हे सुद्धा वाचा

सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती पुढे

सुसाईड नोटमध्ये बिदिशाने स्वतःला कॅन्सरने पीडित असल्याचे सांगितले आहे. यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. असे सांगितले जात आहे की, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री डिप्रेशनमध्ये देखील होती. काही दिवसांपूर्वी बिदिशाच्या बॉयफ्रेंडने तिची फसवणूक देखील केली होती. बिदिशासोबतच डेट करत असताना तो आणखींन दोन मुलींसोबत देखील रिलेशनशिपमध्ये होता. यामुळे ती बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें