AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वऱ्हाडींच्या बसवर काळाचा घाला, स्कॉर्पिओतील चौघे जागीच ठार, 6 जणांची प्रकृती चिंताजनक

Bihar Accident : ऐन लग्नसराईत असलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सध्या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. ओव्हर टेकिंगच्या (over taking) नादात हा अपघात घडला.

वऱ्हाडींच्या बसवर काळाचा घाला, स्कॉर्पिओतील चौघे जागीच ठार, 6 जणांची प्रकृती चिंताजनक
भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू
| Updated on: Feb 20, 2022 | 12:07 AM
Share

बिहार : लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसवर काळानं घातलाय. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू (4 killed in road accident) झालाय. 6 पेक्षा जास्त जणांची प्रकृती गंभीर असून त्यांनी जबर मार लागला आहे. स्कॉर्पिओ कार आणि एका बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि हा भीषण अपघात घडला. बिहारमध्ये (Bihar) ही हृदयद्रावक घटना घडली असून लग्नासाठी चाललेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. बिहार राज्यातील बक्सर इथं संध्याकाळी हा भीषण अपघात घडला. बक्सरच्या कृष्ण ब्रम्हा ठपोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला असून यामुळे ऐन लग्नसराईत असलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सध्या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. ओव्हर टेकिंगच्या (over taking) नादात हा अपघात घडला असल्याचं सांगितलं जातंय.

पोलिसांनी अपघातप्रकरणी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आजतकचे पुष्पेंद्र पांडे यांनी याबाबतचं वृत्त दिलंय.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अंगवार काटा आणणारा अनुभव

दरम्यान, या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली माहिती थरकाप उडवणारी आहे. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. लग्न लावण्यासाठी कुटुंबीयात मोठ्या उत्साहात घरातून निघाले होते. लग्नाच्या आनंदात निघाले असतानाच बसमधील कुटुंबीयांची लगबग सुरु होती. लग्नाबाबत गप्पा गोष्टी बसमध्ये सुरु होत्या. दरम्यान, एका भरधाव स्कॉर्पिओ कारनं ओव्हरटेक करण्याच्या नादात लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसला समोरासमोरच जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचा प्रचंड नुकसान झालं आहे. लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेली बस ही बक्सरच्या दिशेनं चालली होती. पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालंय.

स्कॉर्पिओमध्ये असलेल्या चार जणांचा मृत्यू झालाय. तर सहापेक्षा अधिक लोक गंभीर जखमी आहेत. या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या हरेंद्र यादव यांनी म्हटलंय, की चार जणांचा या अपघातात जागीच जीव गेला. तर जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातील मृतांमध्ये चारही जण हे पुरुष असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

स्कॉर्पिओचा चक्काचूर

दरम्यान, या अपघातानंतर स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला असून पोलिस आता या अपघातप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अपघातानंतर स्कॉर्पिओमधील मृत्यू झालेले प्रवासी आतमध्ये अडकले होते. त्यांना बाहेर कसं काढायचं, असा प्रश्न पोलिसांनी पडला होता. ओव्हरटेकिंगच्या नादात हा भीषण अपघात घडलाय. त्याचप्रमाणेत या अपघातामुळे वेगावर नियंत्रण ठेवणं आणि अतिवेगाला बळी पडणं किती महत्त्वाचं आहे, हे देखील अधोरेखित झालंय.

संबंधित बातम्या :

ट्रक, टँकर आणि पिकअपचा विचित्र अपघात, अपघातात पिकअप वाहनाचा चक्काचूर, 1 गंभीर जखमी

ट्रकचा चेंदामेंदा, रस्त्यावर लाल चिखल! औरंगाबादमधील वैजापुरात विचित्र अपघात कसा घडला?

आयशर ट्रकचा भीषण अपघात, तिघे जागीच ठार, औरंगाबादच्या शिवराई फाट्यावरची घटना

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.