Bihar Crime | पत्नीची हत्या करुन पती मेहुणीसह फरार, मृतदेह बंद पेटीत आढळला, बिहारमधील घटना

बिहारमधील (Bihar) बारह (Barh) जिल्ह्यातून पती-पत्नीच्या (Husband Wife) नात्याला काळीमा फासणारी घटना पुढे आली आहे. येथे पती आपल्या पत्नीचा खून (Wife Murder) करुन मेहुणीसह पळून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच मोकामा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला.

Bihar Crime | पत्नीची हत्या करुन पती मेहुणीसह फरार, मृतदेह बंद पेटीत आढळला, बिहारमधील घटना
मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Nov 16, 2021 | 12:15 PM

पाटणा : बिहारमधील (Bihar) बारह (Barh) जिल्ह्यातून पती-पत्नीच्या (Husband Wife) नात्याला काळीमा फासणारी घटना पुढे आली आहे. येथे पती आपल्या पत्नीचा खून (Wife Murder) करुन मेहुणीसह पळून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच मोकामा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला.

बंद पेटीत मृतदेह आढळला

मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय वर्षा कुमारी असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती देताना मोकामाचे एसएचओ राजनंदन शर्मा म्हणाले, ‘प्रथम दृष्‍टी हे हत्‍येचे प्रकरण असल्याचे निदर्शनास येते, कारण बंद पेटीतून मृतदेह बाहेर काढण्‍यात आला आहे. तपासात मृत शनी पासवानचा पती फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे.’

या प्रकरणाबाबत परिसरातील नागरिकांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरुये. शनी पासवानने आपल्या पत्नीची हत्या केली असून हत्येनंतर तो आपल्या मेहुणीसह फरार असल्याची चर्चा आहे.

मेहुणीशी प्रेम संबंध

एसएचओने दिलेल्या माहितीनुसार, 4 वर्षांपूर्वी वर्षा कुमारी यांचे शनी पासवानसोबत लग्न झाले होते. मात्र, शनी पासवानचे पत्नी वर्षाच्या बहिणीशी प्रेम संबंध होते. त्यामुळे पत्नीची हत्या करुन शनी आपल्या मेहुणीसह फरार झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.

दिल्लीत महिलेवर अ‍ॅसिड हल्ला

राजधानी दिल्लीत (Delhi Acid Attack) 12 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या अ‍ॅसिड पीडितेने (Acid Attack Victim) अखेर उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. सोमवारी दुपारी राम मनोहर लोहिया रुग्णालयात महिलेने अखेरचा श्वास घेतला. शवविच्छेदनानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महिलेच्या मृत्यूनंतर तिचा पती आणि तीन निरागस मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आरोपीने तिच्या मुलांना निराधार केले आहे. त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी पीडितेच्या पतीने केली आहे.

ही खळबळजनक घटना घडवून आणणाऱ्या आरोपीचे नाव मोंटू असून तो महिलेवर अ‍ॅसिड ओतून फरार झाला होता. मोंटूने महिलेचे हात बांधून तिच्या अंगावर अ‍ॅसिड ओतल्याची घटना 3 नोव्हेंबर रोजी घडली होती. पीडित महिलेचे 2011 मध्ये लग्न झाले होते. ती पती आणि तीन मुलांसह पूंठखुर्द येथे राहत होती. तिला नऊ वर्षांची मोठी मुलगी आणि सात आणि पाच वर्षांची दोन मुले आहेत.

संबंधित बातम्या :

नोएड्यातील पोलीस ठाण्यात अजब तक्रार दाखल, पतीच्या सांगण्यावरुन पत्नीविरोधात हनीट्रॅपचा गुन्हा

Kerala RSS worker killed: 27 वर्षीय संघ कार्यकर्त्याची पत्नीसह बाहेर जाताना धारदार शस्त्रानी हत्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें