Double Murder | अनैतिक संबंधांचा संशय, 22 वर्षीय पत्नीसह लेकीची हत्या, तलावात मृतदेह सापडले

Double Murder | अनैतिक संबंधांचा संशय, 22 वर्षीय पत्नीसह लेकीची हत्या, तलावात मृतदेह सापडले
'मोक्ष' प्राप्तीचा येडा नाद, लेकरं बाळं, बायको जीवानीशी बाद, एकाच घरात 5 मृतदेह

सविताचे तिच्या जवळच्या व्यक्तीशी संबंध असल्यावरुन वाद सुरु होते. यामुळे निकेश पत्नी सविता सोबत राहण्यास नकार देत होता. या प्रकरणी कटोरिया पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यावरुन निकेशला काही महिने तुरुंगाची हवा खावी लागली होती.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 10, 2021 | 1:08 PM

पाटणा : चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मायलेकीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिहारच्या बांका गावातील तलावात विवाहिता आणि तिच्या दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला. त्यानंतर महिलेचा पती आणि सासरची मंडळी फरार झाली आहेत. विवाहितेच्या वडिलांनी जावयासह पाच जणांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पतीला संशय होता. यावरुन दोघांमध्ये अनेक वेळा खटके उडत असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुहेरी हत्याकांडाची घटना कटोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कागीसर येथे घडली आहे. घटना घडल्यापासून महिलेच्या सासरची सर्व मंडळी घर सोडून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. 22 वर्षीय सविता देवी असं मयत महिलेचं नाव आहे. सविताचा विवाह अडीच वर्षांपूर्वी कागीसर येथील निकेश यादव याच्याशी झाला होता, मात्र लग्नानंतर महिलेचा छळ होत असल्याचा आरोप आहे.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सविताचे तिच्या जवळच्या व्यक्तीशी संबंध असल्यावरुन वाद सुरु होते. यामुळे निकेश पत्नी सविता सोबत राहण्यास नकार देत होता. या प्रकरणी कटोरिया पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यावरुन निकेशला काही महिने तुरुंगाची हवा खावी लागली होती. यानंतर निकेश आणि सविता यांचे संबंध बिघडले. सविताचे वडील सासरच्यांशी बोलून वाद शांत करायचा प्रयत्न करायचे. मात्र प्रकरण वाढतच गेले.

सविता आणि मुलगी बेपत्ता झाल्या होत्या. बुधवारी संध्याकाळी गावातील तलावातून चादरीत गुंडाळलेले मायलेकीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

दोन हजार रुपये वापरल्याचा आरोप

निकेश यादव लग्नानंतर कोलकाता येथे राहून मजुरीचे काम करायचा. तो वेळोवेळी घरी पैसे पाठवत असे. पंचायत निवडणुकीपूर्वीही निकेशने 20 हजार रुपये घरी पाठवले होते. हे पैसे सविताच्या हातात पडले होते. यातील दोन हजार रुपये खर्च केल्याचा आरोपही सवितावर ठेवण्यात आला होता. पंचायत निवडणुकीत निकेश घरी आला तेव्हा दोन हजार रुपयांवरुन त्यांची वादावादी झाली होती.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सविताच्या वडिलांसह इतरांनी कटोरिया पोलीस ठाणे गाठले. आपली मुलगी आणि नातीची हत्या करून त्यांना तलावात टाकल्याचा आरोप सविताच्या वडिलांनी केला आहे. या हत्येप्रकरणी जावई निकेश, सासू, मेहुणा यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. त्याचवेळी कटोरिया पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

बांधकामाच्या ठिकाणी वर्षभराच्या चिमुकलीला ठेवले, सिमेंटच्या ट्रकनं केला तिचा चेंदामेंदा!

मैत्रिणीला परीक्षेत मदत केल्याचा राग, तिघांचा तरुणावर चाकूहल्ला

कर्नाटकातून आलेल्या हल्लेखोराने का केला हल्ला? कारण सांगण्यास पोलिसांचा नकार, डॉ. राफे खून प्रकरण!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें