AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा खून, आता गावातील 9 जणांच्या हत्येची धमकी, साधूमुळे गावात खळबळ

साधू मोतीलाल यादव याने चौतरवा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या लक्ष्मीपूर गावातील तारा देवी नावाच्या महिलेसोबत दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून महिलेच्या दोन अल्पवयीन मुलींनी आरडाओरड केली. त्यामुळे साधूने दोघींच्या डोळ्यांदेखतच महिलेची धारदार शस्त्राने हत्या केली

एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा खून, आता गावातील 9 जणांच्या हत्येची धमकी, साधूमुळे गावात खळबळ
अवघ्या 17 दिवसांपूर्वीच लग्न, डोळ्यात संसाराची स्वप्न अन् संशयास्पद मृत्यू
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 2:29 PM
Share

पाटणा : बिहारमधील बगहा गावात एका साधूने खळबळ उडवून दिली आहे. या भयावह साधूने पोलिसांसह ग्रामस्थांची अक्षरशः झोप उडवली आहे. कोणी त्याला डोकं फिरलेला आशिक म्हणतं, तर कोणी नरभक्षक साधू, मात्र गावात त्याची इतकी दहशत माजली आहे, की त्याचं साधं नाव ऐकूनही अनेकांच्या अंगावर शहारे येतात. मोतीलाल यादव असं या साधूचं नाव असून त्याने गेल्याच आठवड्यात एकतर्फी प्रेमातून एका महिलेची हत्या केली. त्यानंतर गावातील 9 जणांच्या हत्येचा विडा त्याने उचलला आहे. साधूच्या शोधासाठी पोलीस दिवसरात्र प्रयत्न करत आहेत, मात्र अजूनही तो कोणाच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि पोलीस अशा सर्वांचीच डोकेदुखी वाढली आहे.

काय आहे प्रकरण?

23 सप्टेंबरला साधू मोतीलाल यादव याने चौतरवा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या लक्ष्मीपूर गावातील तारा देवी नावाच्या महिलेसोबत दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून महिलेच्या दोन अल्पवयीन मुलींनी आरडाओरड केली. त्यामुळे साधूने दोघींच्या डोळ्यांदेखतच महिलेची धारदार शस्त्राने हत्या केली. क्रौर्याची परिसीमा म्हणजे तिचं शीरही त्याने धडावेगळं केलं. त्यानंतर तो घटनास्थळावरुन पसार झाला. या महिलेवर साधूचं एकतर्फी प्रेम होतं. हत्या झाल्यापासून पोलीस त्याच्या शोधासाठी छापेमारी करत आहेत, मात्र तो हाती लागलेला नाही.

9 जणांची हत्या करण्याची धमकी

गावातील तब्बल 9 जणांची हत्या करण्याची धमकी साधूने दिली आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. हा साधू दिवसभर ऊसाच्या शेतात लपून बसतो. सूर्य मावळताच गावात दाखल होतो. त्याच्या हातात परशू आणि पिस्तूल असल्याचं बोललं जातं. त्यामुळे लक्ष्मीपूर गावातील रहिवासी रात्रभर हातात लाठ्याकाठ्या घेऊन गावाच्या सुरक्षेसाठी उभे असतात. ऊसाच्या शेतातून आरडाओरड करत साधू नऊ जणांना जीवे ठार मारण्याची धमकी देत असतो. गावकऱ्यांनी शेतात जाणंही बंद केलंय. बायका-मुली संध्याकाळनंतर घराबाहेर पाऊलही ठेवत नाहीत. फक्त लक्ष्मीपूरच नाही, तर आसपासच्या गावांमध्येही साधूची दहशत पसरली आहे. दिवस-रात्र फक्त साधूचीच गावात चर्चा असते. गावकऱ्यांना दुसरे विषय उरले नसून केवळ जीव मुठीत घेऊन जगणं ही एकच गोष्ट उरली आहे. गावकऱ्यांची अक्षरशः झोप उडाली असून त्याला तातडीने जेरबंद केल्याची मागणी केली जात आहे.

व्याधा हत्याकांडात प्रमुख आरोपी

साधू मोतीलाल यादव याची दहशत 1992 पासून आहे. बहुचर्चित व्याधा हत्याकांडात तो प्रमुख आरोपी होता. त्या प्रकरणात त्याची शिक्षा भोगून झाली आहे. मात्र साक्षीदारांअभावी त्याची सुटका झाली.

लक्ष्मीपूर गावातील बेचू यादव यांच्या 40 वर्षीय पत्नी तारा देवी यांच्यावर साधू मोतीलाल यादव याचे एकतर्फी प्रेम होते. बेचूने साधूला अनेक वेळा आपल्या बायकोपासून दूर राहण्याची तंबी दिली होती. मात्र तो ऐकायला तयार नव्हता. तारा देवीने त्याला धुडकावून लावल्याने त्याने तिची हत्या केली.

संबंधित बातम्या :

आजीचा उपचारादरम्यान मृत्यू, दारु पिऊन नातवाचा पुण्यातील रुग्णालयात राडा, डॉक्टरांना मारहाण

जवानाच्या आई-वडिलांची आत्महत्या, दोन झाडांना गळफास घेत आयुष्य संपवलं

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.