Crime | गर्लफ्रेंडमध्ये जीव अडकला, लग्नासाठी स्वत:च्याच हत्येचा केला बनाव, तरुणाचे धाडस पाहून पोलीसही चक्रावले

Crime | गर्लफ्रेंडमध्ये जीव अडकला, लग्नासाठी स्वत:च्याच हत्येचा केला बनाव, तरुणाचे धाडस पाहून पोलीसही चक्रावले
MURDER

ब्लड बँकेतून रक्त विकत घेत स्वत:ची हत्या झाल्याचा बनाव केला. या कटात त्याची प्रेमिका आणि काही मित्रांचा समावेश होता. या प्रकरणात पोलिसांनी या माथेफिरू तरुणाला अटक केलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 20, 2022 | 9:45 AM

पटणा : बिहारमधील (Bihar)छपरा जिल्ह्यातील एका युवकाने आपले प्रेम मिळवण्यासाठी अजब कारनामा केला आहे. त्याने प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी थेट स्वत:च्याच हत्येचा (Murder) बनाव केला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी या युवकाने एक कार भाड्याने घेतली. तसेच ब्लड बँकेतून रक्त विकत घेत स्वत:ची हत्या झाल्याचा बनाव केला. या कटात त्याची प्रेमिका आणि काही मित्रांचा समावेश होता. या प्रकरणात पोलिसांनी (Police) माथेफिरू तरुणाला अटक केलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या अजब प्रकारामुळे सगळेच चक्रावले असून तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना सोडून देण्यात आलं आहे.

नेमका प्रकार काय आहे ?

या घटनेबाबत आजतकने सविस्तर वृत्त दिलेलं आहे. आजतकच्या वृत्तानुसार स्वत:च्याच हत्येचा बनाव करणारा तरुण बिहारमधील अरना पंचायतीमधील बरवाघाड बुलाआ टोला या गावातील रहिवाशी असून मुन्ना शाह असे त्याचे नाव आहे. या तरुणाची प्रेमसंबंधातून हत्या झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी तरुणाच्या कथित हत्येचा तपास सुरु केला होता. पोलिसांनी मशरक पोलीस ठाणे तसेच अलावा, गोपालंगज येथील वैकुंठपूर पोलीस ठाण्यात चौकशी केली. पोलिसांनी गावातील नदी तसेच तलावातदेखील तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेतला. मात्र मागील तीन दिवसांपासून शोध घेऊनदेखील तरुणाचा मृतदेह सापडला नाही.

पोलिसांनी पाच लोकांना केलं होतं अटक

या प्रकरणात पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला होता. मात्र तरुणाचा मृतदेह न सापडल्यामुळे एसपी संतोष कुमार यांनी कथित मृत तरुणाचा मोबाईल फोन ट्रेस करणे सुरु केले. मोबाईल ट्रेस करताच पोलिसांना या प्रकरणात मोठी माहिती मिळाली. तरुणाची हत्या झालेली नसून तो जिवंत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला बुधवारी, दरियापूर येथून ताब्यात घेतलं. मुन्ना शाह हत्या प्रकरणात पोलिसांनी एकूण पाच जाणांना अटक केलं होतं. मात्र शाहची हत्या झाली नसून तो जिवंत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी आरोपींना सोडून दिलं आहे.

नातेवाईकांना त्रास देण्यासाठी रचला हत्येचा कट

मुन्ना शाहला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस या तरुणाची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीत त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने आपल्याच नातेवाईकांना त्रास देण्यासाठी स्वत:च्या हत्येचा बनाव केला होता. नातेवाईकांना त्रास दिल्यानंतर ते प्रेसयीशी लवकर लग्न लावून देतील असा अटक करण्यात आलेल्या मुन्ना शाहचा अंदाज होता. पोलिसांनी सध्या प्रेमी मुन्ना शाह तसेच प्रेयसीला अटक केलं आहे.

इतर बातम्या :

Nashik | तरुणास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकाराला नाशिकमध्ये बेड्या

Ulhasnagar Crime | उल्हासनगरात चक्क महिला बनल्या जुगारी, पोलिसांनी धाड टाकत ठोकल्या बेड्या

बीडमध्ये प्रेमी युगुलाचा गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न, तरुणाचा मृत्यू तर दोर तुटल्याने महिला बचावली


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें