Ulhasnagar Crime | उल्हासनगरात चक्क महिला बनल्या जुगारी, पोलिसांनी धाड टाकत ठोकल्या बेड्या

ल्हासनगरात पोलिसांनी चक्क एका महिलांच्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केलाय. जुगारी महिलांवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा लाईव्ह व्हिडीओदेखील समोर आलाय. विशेष म्हणजे या महिला मनोरंजन म्हणून नव्हे तर हजारो रुपयांचा जुगाराचा खेळ खेळत होत्या.

Ulhasnagar Crime | उल्हासनगरात चक्क महिला बनल्या जुगारी, पोलिसांनी धाड टाकत ठोकल्या बेड्या
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 7:58 AM

ठाणे : राज्यात ड्रग्ज, जुगार अशा अवैध गोष्टींना प्रतिबंध आहे. काही लोकांना जुगार खेळणं तर प्रतिष्ठेचं वाटतं. जुगार म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर पैसे लावून पत्ते खेळणारे पुरुष येतात. पण उल्हासनगरात (Ulhasnagar) पोलिसांनी चक्क एका महिलांच्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केलाय. जुगारी महिलांवर पोलिसांनी (Police) केलेल्या या कारवाईचा लाईव्ह व्हिडीओदेखील समोर आलाय. विशेष म्हणजे या महिला मनोरंजन म्हणून नव्हे तर हजारो रुपयांचा जुगाराचा (Gambling) खेळ खेळत होत्या. जुगार खेळणाऱ्या या महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

महिलांकडून 47 हजार रुपये जप्त 

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील सेक्शन 22 मध्ये एका घरात महिलांचा जुगाराचा अड्डा भरत असल्याची गोपनीय माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महिला पोलिसांना सोबत घेत या अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी सात महिला पैसे लावून जुगार खेळत असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यांच्याकडून 47 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

अड्डा भरवणारी महिला घ्यायची 1 हजार रुपये

अटक करण्यात आलेल्या महिलांवर जुगार प्रतिबंधक अधिनियम आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे या सगळ्या महिला चांगल्या घरातल्या आहेत. जुगाराचा अड्डा भरवणारी महिला ही त्यांच्याकडून एका वेळचे 1 हजार रुपये घेत असल्याचं सुद्धा पोलीस तपासात समोर आलंय. त्यामुळं पुरुषांसारखेच महिलासुद्धा जुगारी बनल्याचं यानिमित्ताने पाहायला मिळतंय.

अपहरण केलेल्या मुलीची सुटका

दरम्यान, उल्हासनगरात गुन्हेगारी घटनांत वाढ होताना दिसत आहे. चार दिवसांपूर्वी अपहरण प्रकरणात एकाला अटक करण्यात आलं होतं. उल्हासनगरातून दोन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली होती. येथील पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी संतोष बाबू अण्णा उर्फ अंडापाव याला या प्रकारणात अटक केलं होतं. हा आरोपी मुलीला घेऊन मागील दोन महिन्यांपासून फरार होता. मात्र त्याला गुजारतमधून अटक करण्यात आले. दोन महिन्यांपासून कोणताही थांगपत्ता न लागू देणाऱ्या या सराईत गुन्हेगाराला त्याच्या फक्त एका चुकीनंतर बेड्या ठोकण्यात आल्या. सध्या मुलीची सुखरुपपणे सुटका करण्यात आली असून ‘अंडापाव’ या सराईत गुन्हेगाराची पोलीस चौकशी केली जात आहे.

इतर बातम्या :

बीडमध्ये प्रेमी युगुलाचा गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न, तरुणाचा मृत्यू तर दोर तुटल्याने महिला बचावली

तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू, प्राचार्य आणि वसतिगृहाच्या वॉर्डनला अटक

इंदापूरमधील भिशी फसवणूक आकडा तब्बल 200 कोटींवर, शेकडो सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.