क्रुझर आणि ट्रेलरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 11 भाविकांचा मृत्यू

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 31, 2021 | 10:42 AM

भाविकांची क्रुझर गाडी आणि ट्रेलर यांची समोरासमोर धडक होऊन बिकानेर-जोधपुर हायवेवर अपघात झाला. अपघातात आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिघा जखमी प्रवाशांनी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले.

क्रुझर आणि ट्रेलरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 11 भाविकांचा मृत्यू
राजस्थानमध्ये क्रुझर आणि ट्रेलरचा भीषण अपघात

Follow us on

जयपूर : राजस्थानच्या बिकानेरमध्ये (Bikaner Rajasthan) राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 11 भाविकांचा मृत्यू झाला. क्रुझर गाडी आणि ट्रेलर यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती आहे. बिकानेर-जोधपुर हायवेवर नोखा नागौर भागात असलेल्या श्री बालाजी गावाजवळ हा अपघात झाला.

कसा झाला अपघात

भाविकांची क्रुझर गाडी आणि ट्रेलर यांची समोरासमोर धडक होऊन बिकानेर-जोधपुर हायवेवर अपघात झाला. अपघातात आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिघा जखमी प्रवाशांनी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना नोखा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. अपघातग्रस्त प्रवासी हे मध्य प्रदेशातील सजनखेडाव दौलतपूरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. ते राजस्थानला देवदर्शनासाठी आले होते. बिकानेर-जोधपुर हायवेवर नोखा नागौर भागात असलेल्या श्री बालाजी गावाजवळ हा अपघात झाला.

अशोक गेहलोत यांच्याकडून श्रद्धांजली

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बिकानेर येथील अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. “नागौरच्या श्री बालाजी भागात झालेल्या भीषण रस्ते अपघातात मध्य प्रदेशला परतणाऱ्या 11 यात्रेकरुंचा झालेला मृत्यू अत्यंत दु:खद आहे. शोकाकुल कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे, ईश्वर त्यांना या कठीण काळात शक्ती देवो आणि दिवंगत व्यक्तींच्या आत्म्यास शांती लाभो. जखमींना लवकर बरं वाटावं, यासाठी प्रार्थना” अशा भावना गेहलोत यांनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या आहेत.

बंगळुरुतील अपघातात आमदारपुत्रासह सुनेचा मृत्यू

दुसरीकडे, आलिशान ऑडी कार रस्त्याशेजारील विजेचा खांब आणि इमारतीवर आदळून बंगळुरुत (Bengaluru car crash) भीषण अपघात झाला. या अपघातात द्रमुक आमदार वाय प्रकाश (Y Prakash) यांच्या मुलगा-सुनेसह सात जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. भरधाव ऑडी कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

संबंधित बातम्या :

ऑडी इमारतीवर आदळून भीषण अपघात, आमदाराच्या मुलगा-सुनेसह सात जणांचा मृत्यू

VIDEO | मुंबईत रेंज रोवर कारचा अपघात, भरधाव गाडी दुभाजकावर धडकली, काचेवर भाजप खासदाराचे चिन्ह

PHOTO : मुंबईत बेस्ट बसला अपघात, चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने बस थेट भाजीच्या दुकानात

मुंबई-बंगळुरु महामार्गावर अपघात, तिघांचा मृत्यू, कारचा चेंदामेंदा

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI