AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मूल होत नाही म्हणून तहसीलदाराचा अभद्र प्रकार, केलं असं काही की तुम्हाला येईल प्रचंड संताप, बायकोसोबत…

नांदेडमधील एका तहसीलदाराने आपल्या पत्नीचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खुद्द दहसीलदाराच्या पत्नीनेच पोलीस ठाण्यात धाव घेत तशी तक्रार केली आहे.

मूल होत नाही म्हणून तहसीलदाराचा अभद्र प्रकार, केलं असं काही की तुम्हाला येईल प्रचंड संताप, बायकोसोबत...
nanded crime
| Updated on: Apr 16, 2025 | 5:24 PM
Share

नांदेड : उच्चपदावर कार्यरत असलेले अधिकारी हे सुशिक्षित असतात. सामाजिक दृष्टीने ते परिपक्व असतात, असं म्हटलं जातं. महिला तसेच समाजातील वेगवेगळ्या वंचित घटकांच्या कल्याणासाठी प्रयत्नरत राहणे हे या अधिकाऱ्यांचे आद्य कर्तव्य असते. अनेक कार्यकर्त्यांनी सर्वांना आदर्श ठरावी अशी कामगिरी करून दाखवलेली आहे. मात्र काही अधिकारी मात्र याला अपवाद असतात. काही अधिकारी तर असे काही कारनामे करून बसतात, की ते समोर आल्यानंतर सर्वांच धक्का बसतो. असाच एक प्रताक नांदेडमधील एका तहसीलदाराने करून दाखवला आहे. या तहसीलदाराने मूल होत नाही म्हणून आपल्याच पत्नीवर अन्वनित अत्याचार केले आहेत. पत्नीच्या तक्रारीनंतर या तहसीलदाराला पोलिसांनी अटक केलं आहे.

नेमकं काय घडलंय?

नांदेडमधील एका तहसीलदाराने आपल्या पत्नीचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खुद्द दहसीलदाराच्या पत्नीनेच पोलीस ठाण्यात धाव घेत तशी तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तहसीलदाराला अटक केली आहे. दाखल तक्रारीनुसार आरोपी तहसीलदाराने पत्नीच्या कानशिलावर बंदूक ठेवली. तसेच मुलबाळ होत नाही म्हणून तहसीलदार पतीने त्याच्या पत्नीचा छळही केला आहे. अविनाश शेंबटवर असं या तहसीलदाराचं नाव असून ते चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अविनाश शेंबटवर यांना नांदेडमधील सासरवाडीत आल्यानंतर अटक केली आहे. याच तहसीलदाराने पत्नीला शारीरिक मानसिक व आर्थिक स्वरुपाचा छळ केल्याचाही आरोप आहे.

नेमका आरोप काय?

तहसीलदाराने पत्नीच्या कानशीलावर बंदूक लावल्याच्या आरोप तक्रारदार पत्नीने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. पैशाची मागणी करणे, मानसिक त्रास देऊन अनैसर्गिक कृत्य करण्यास जबरदस्ती करणे, मुलबाळ होत नाही म्हणून पत्नीला त्रास देणे, असे आरोप तहसीलदार अविनाश शेंबटवार यांच्यावर त्यांच्या पत्नीने केले आहेत. याबाबत पीडित पत्नीने माहेरी आल्यानंतर तहसीलदार पतविरुद्ध नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तहसीलदार अविनाश शेंबरवाड नांदेड येथे आले असता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दीड वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.