Nagpur : गाडीला कट मारताना लागला धक्का, चालकाला गाडीच्या बाहेर खेचून बडवला, अंगावरील कपडे सुद्धा फाडले…

महेश घोलप, Tv9 मराठी

Updated on: Jan 24, 2023 | 10:02 AM

Nagpur : गाडीला कट मारल्यामुळे कार चालकाला बडवला, अंगावरील कपडे सुद्धा फाडले, पाहणाऱ्यांनी बनवला व्हिडीओ

Nagpur : गाडीला कट मारताना लागला धक्का, चालकाला गाडीच्या बाहेर खेचून बडवला, अंगावरील कपडे सुद्धा फाडले...
Video viral on social media
Image Credit source: tv9marathi

नागपूर : नागपुरात (Nagpur) गाडीला कट लागल्याच्या वादातून कारचालकाला (car driver) जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video viral on social media) व्हायरल झाला आहे. भोले पेट्रोल पंपजवळ कारचालकाला दुचाकीस्वार तरुण मारहाण करत असल्याचा व्हिडीओत दिसत आहे. प्रथम सारडा हा तरुण आपल्या कारमध्ये पेट्रोल भरून भोले पेट्रोल पंपकडून ट्रॅफिक पार्ककडे जात होता. त्यावेळी एका बाईकने त्याच्या कारला धडक दिली. यावरून प्रथम सारडा आणि दुचाकीवरील तरुणांमध्ये चांगलाचं वाद सुरु झाला.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे त्या तरुणांनी कार चालक प्रथम सारडा याला कारच्या बाहेर खेचत मारहाण कऱण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर शिवीगाळ करत त्याच्या अंगावरील कपडे सुद्धा फाडले. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ एका नागरिकाने चित्रित केला आहे. या प्रकरणी चार तरुणांविरुद्ध सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. रस्त्यावर वाहन चालवताना होणारे वाद आणि त्यावरून भर रस्त्यात मारहाण हे अतिशय गंभीर आहे. पोलिस त्या व्हिडीओचा आधार घेत चौकशी करीत आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI