Vasai Crime : कॉलेजमधील वाद घरापर्यंत आला, घरात घुसून तरुणाकडून तरुणीला मारहाण

मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. दापोली, जळगाव येथील घटना ताज्या असतानाच आता वसईत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Vasai Crime : कॉलेजमधील वाद घरापर्यंत आला, घरात घुसून तरुणाकडून तरुणीला मारहाण
वसईत कॉलेज तरुणीला मित्राकडून मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 10:38 AM

वसई / 4 ऑगस्ट 2023 : महिला आणि तरुणींवरील अत्याचार थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. दापोलीतील तरुणीची हत्या, लांजामध्ये दुहेरी हत्याकांड, जळगावमध्ये चिमुरडीची अत्याचार करुन हत्या या घटना ताज्या असतानाच आता वसईत कॉलेज तरुणीला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे वसईत एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आरोपीने तरुणीच्या घरात घुसून तिला बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी वसईतील वालीव पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात भादवी कलम 307, 394, 452, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. अमन अजय मधेसिया असे 21 वर्षीय अटक तरुणाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

पीडित तरुणी आणि आरोपी तरुण दोघेही वसई पश्चिमेतील आर.पी. महाविद्यालयात एकाच वर्गात शिकतात. दोघांमध्ये कॉलेजमध्ये काही कारणातू वाद झाला होता. याच वादाच्या रागातून तरुणाने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. पोलीस याप्रकरणी आरोपीची चौकशी करत आहेत. चौकशीअंती ही घटना नक्की कोणत्या कारणातून घडली हे स्पष्ट होईल.

दरम्यान, या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी तरुणीला उपचारासाठी कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरुण तरुणीमध्ये नेमका काय वाद होता, याबाबत पोलीस तपासानंतरच सत्य उघड होईल. तरुणी, महिलांवरील अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. खुलेआम होत असलेल्या या घटनांमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिला नसल्याचे दिसून येते.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.