High Court : पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे ही मानसिक क्रूरता, उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

पत्नीची इतर महिलांशी तुलना करणे तसेच ती पतीच्या अपेक्षेप्रमाणे जगत नसल्याबद्दल पतीकडून वारंवार टोमणे मारणे ही मानसिक क्रूरता असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

High Court : पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे ही मानसिक क्रूरता, उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
पीएफआय प्रकरणातील संशयित आरोपींच्या कोठडीत वाढImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 5:03 PM

तिरुवनंतपुरम : घरात जर पत्नीची टिंगल करीत असाल तर सावध राहा. कारण हीच थट्टामस्करी प्रसंगी तुमच्या संसारात कायदेशीर विघ्न आणू शकते. केरळच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने पतीराजांना पत्नीशी जपून, तोंड सांभाळून वागण्याची जणू ताकीदच दिली आहे. पत्नीची टिंगल करणे, तिला अधूनमधून टोमणा (Taunt) मारणे तसेच तिची परिसरातील इतर महिलांशी तुलना (Compare) करणे हे सगळे प्रकार म्हणजे पत्नीची एक प्रकारे क्रूरताच आहे. या क्रूरतेचा दावा करीत महिलेला पतीपासून घटस्फोट मिळवता येऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निकाल देत केरळ उच्च न्यायालया (Kerala High Court)ने सर्वच नवरोबांना मोठा धक्का दिला आहे. पत्नीची इतर महिलांशी तुलना करणे तसेच ती पतीच्या अपेक्षेप्रमाणे जगत नसल्याबद्दल पतीकडून वारंवार टोमणे मारणे ही मानसिक क्रूरता असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. हा निकाल पतीच्या रोजच्या कटकटीला वैतागलेल्या महिलांसाठी मोठा दिलासा देणारा मानला जात आहे.

घटस्फोटाच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

घटस्फोटाच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली. एका व्यक्तीने घटस्फोटासाठी केरळ उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या व्यक्तीचे 2019 मध्ये लग्न झाले होते. दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. समेटाचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. महिलेच्या बाजूने पतीच्या क्रौर्याचा उल्लेख करण्यात आला. न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन आणि न्यायमूर्ती सीएस सुधा यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे ही मानसिक क्रूरता आहे. पत्नीने ते सहन करणे अपेक्षित नाही.

पत्नी सुंदर नाही असे म्हणत पती सतत त्रास द्यायचा

ती सुंदर नाही, ती आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही, असे सांगून तिचा नवरा तिला सतत त्रास देत असल्याचे या महिलेने केरळ उच्च न्यायालयात सांगितले. यामुळे तिची निराशा व्हायची. न्यायालयानेही या प्रकरणात मध्यस्थी करून पती-पत्नी दोघांनाही मध्यस्थी पाठवून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. कोर्टाने आपल्या निर्णयात असेही म्हटले आहे की, जेव्हा पती-पत्नी एकदा वेगळे होतात आणि हे वेगळेपण दीर्घकाळ राहिले. त्यानंतर दोघांपैकी एकाने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली, तर लग्न मोडले आहे, असे मानले जाऊ शकते. (Comparing wife with another woman is mental cruelty, Kerala High Court observes)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.