Pooja Gaikwad : आता सगळं संपलं, पूजा गायकवाडच्या अडचणीत वाढ, मोठी अपडेट समोर!
गोवंद बर्गे आत्महत्या प्रकरणात पूजा गायकवाड हिची अडचण वाढली आहे. न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला असून आता पोलिसांना तिची चौकशी करायला वेळ मिळणार आहे.

Govind Barge And Pooja Gaikwad : बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. नर्तिका पूजा गायकवाड हिच्योसबत त्यांचे प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात आहे. पूजा टाळाटाळ करत असल्यामुळे त्यांनी पूजाच्या सोलापुरातील गावात जाऊन कारमध्ये स्वत:वर गोळ्या झाडल्या होत्या. दरम्यान, ही घटना समोर येताच आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. आता या प्रकरणात आरोपी असलेल्या पूजा गायकवाड हिच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. न्यायालयाने तिच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.
नेमकं काय घडलं?
गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाशी कथित संबंध असलेल्या पूजा गायकवाड हिला ताब्यात घेतले होते. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. तपासात अनेक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने तिला अगोदर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर तिला बार्शीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने यावेळी दोन्ही बाजू जाणून घेतल्या आणि तिची पोलीस कोठडी वाढवण्याचा निर्णय घेतला. तिला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता तिला आणखी दोन दिवस कोठडीतच राहावे लागणार आहे. दरम्यान कोठडीच्या काळात तिची कसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पूजा गायकवाड हिच्यावर नेमके आरोप काय?
पूजा गायकवाड आणि मृत गोविंद बर्गे हे बऱ्याच दिवसांपासून प्रेमात होते असे सांगण्यात येते. मधल्या काळात गोविंद बर्गे यांनी पूजाला महागडा मोबाईल घेऊन दिला. तसेच दागिने, सोनेही दिले. परंतु पाच एकर जमीन भावाच्या नावे करण्यावरून त्यांच्यात वाद चालू झाला. पूजा गोविंद बर्गे यांना टाळत होती. पूजाची समजूत काढण्यासाठी गोविंद बर्गे थेट पूजाच्या गावात गेले होते. मात्र तिथेही पूजाने काहीही ऐकून न घेतल्याने नंतर कारमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडल्याचे सांगितले जात आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून पूजा गोविंद बर्गे यांना ब्लॅकमेल करत असल्याचाही दावा केला जातोय. गोविंद बर्गे एका कला केंद्रात पूजाच्या संपर्कात आले होते. पूजा एक नर्तकी असून नंतर या दोघांत प्रेमसंबंध जुळले होते. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
