AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Crime Govind Barge Death : त्या एका घटनेनं सर्वच बदललं, पूजा गायकवाडच्या फॉलोअर्समध्ये… कमेंट अशा की…

Pooja Gaikwad Insta Followers Increased : पूजा गायकवाडचे इन्स्टाग्रामवर अधिकृत अकाऊंट असून गेल्या दोन दिवसांत तिच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याच अकाऊंटवरून तिने तिच्या डान्सचे व्हिडीओ आणि रील्स शेअर केली होती. हातात 500 रुपये घेऊन केलेलं ते रीलही सध्या प्रचंड चर्चेत आहे.

Beed Crime Govind Barge Death : त्या एका घटनेनं सर्वच बदललं, पूजा गायकवाडच्या फॉलोअर्समध्ये... कमेंट अशा की...
गोविंद बर्गे- पूजा गायकवाड
| Updated on: Sep 12, 2025 | 12:17 PM
Share

बीडच्या गेवराईतील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Gowind Barge) यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. सासुरे गावात कारमध्ये त्यांचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ माजली. डोक्यात गोळी लागल्याने गोविंद यांचा मृत्यू झाला. आता ही आत्महत्या आहे की घातपात यावरून बरीच उलटसुलट चर्चा आहे. कारण बर्गे यांच्या नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की आमच्या दादाकडे साधी काठीपण नव्हती, त्यामुळे पिस्तुल कशी येईल? असा सवाल उपस्थित करत त्यांनी घातपाताच संशय नोंदवला आहे. बर्गे यांच्या मृत्यूप्रकरणात नर्तिका पूजा गायकवाड (वय 21) (Pooja Gaikwad) हिचं नाव सातत्याने समोर येत असून तिच्या प्रेमात वेड्या झालेल्या बर्गे यांनीचआयुष्य संपवलं असं काहीचं म्हणणं आहे. तर काही दिवसांपासून ते तणावात होते , कोणाशी बोलत नव्हते अशी माहिती मित्रांनी पोलिसांना दिली आहे.

या सर्वांत पूजा गायकवाड बरीच चर्चेत असून सोशल मीडियावरही तिच्या नावाची बरीच चर्चा सुरू आहे. बर्गे यांच्या नातेवाईकांच्या आरोपानंतर पोलिसांनी पूजाविरोधात गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतनर्लं. कोर्टाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली असून पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत. त्याचदरम्यान तिने गोविंद बर्गेंशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. याप्रकरणात अजून नवनवे काय खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पूजाच्या इन्स्टा फॉलोअर्समध्ये पाचपट वाढ !

नर्तिका असलेल्या पूजाचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट असून तिथे ती डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते. तसेच वेगवेगळी रील्सही तिने टाकली आहेत. मात्र विशेष बाब म्हणजे 2 दिवसांपूर्वी पूजाचे अवघे 500-700 फॉलोअर्स होते. मात्र गोविंद बर्गे मृत्यूप्रकरण समोर आल्यानंतर तिच्या फॉलोअर्समध्ये दामदुपटीने वाढ झाली आहे. आज (12 सप्टेंबर) तिचे एकूण 24 हजार 777 फॉलोअर्स आहेत.तिने या अकाऊंटवर आत्तापर्यंत 30 पोस्ट केल्या असून त्यामध्ये 500 रुपयांच्या नोटेसह केलेल्या रीलची तर तूफान चर्चा आहे. तसेच बर्गे यांच्या मृत्यूपूर्वी तिची इन्स्टा स्टोरीही खूप चर्चा होती.

Beed Crime Govind Barge Death : माजी उपसरपंच गोविंद बर्गेंच्या मृत्यूवेळी नर्तकी पूजा कुठे होती ? पोलिसांचा मोठा खुलासा

Beed Crime Govind Barge Death : उपसरपंच गोविंद बर्गेच्या मृत्यूनंतर आता पूजाने तोंड उघडलं, दिली मोठी कबुली

तसेच पूजा हिने आधी पोस्ट केलेल्या व्हिडीओवरही अनेक कमेंट्स आल्या आहेत, मात्र त्यातल्या बऱ्याचशा कमेंट्स या शिव्या देणाऱ्या, दूषणं देणाऱ्या किंवा अश्लील भाषेतील, कमरेखालच्या शब्दांतील कमेंट्स आहेत. उप सरपंच गेला हिच्या मुळे सरपंच उप सरपंच सदस्य नगरसेवक मित्रांनी सावध रहा अशी कमेंट एकाने केली आहे तर एक कुटुंब उघड्यावर आणलस तु नाचे, अशा शब्दांत एक यूजरने या संपूर्ण प्रकरणावरून संताप व्यक्त केला आहे. तर एका युजरने मात्र या घटनेच फक्त पूजाची चूक नसल्याचे म्हटले आहे.’चूक ह्या ताई ची नाही आहे. उपसरपंचची पण आहे. घरात बायको असतानाही त्याचे हिच्याशी प्रेमसंबंध होते’ असं एका यूजरने लिहीलं आहे. एकंदरच सोशल मीडियावर पूजा गायकवाड खूपच चर्चेत असून दिवसेंदिवस तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत चालल्याचे दिसत आहे.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.