मोठी बातमी: परमबीर सिंगांनी आमच्याकडून खंडणी उकळली; क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप

018 साली परमबीर सिंग यांनी मकोका लावून माझ्याकडून 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केले. | Param Bir Singh Sonu Jalan

मोठी बातमी: परमबीर सिंगांनी आमच्याकडून खंडणी उकळली; क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सोमवारी हजर राहण्याचे चांदिवाल आयोगाचे आदेश
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 12:18 PM

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्यावरच आता पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर हे आरोप केले आहेत. 2018 साली परमबीर सिंग यांनी मकोका लावून माझ्याकडून 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केले. याशिवाय, सोनू जालान याने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत. (Cricket Bookie Sonu Jalan accused extortion charges against Param Bir Singh)

यासंदर्भात सोनू जालान याने पोलीस महासंचालक संजय पांडे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी हे प्रकरणा तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

केतन तन्ना यांच्याकडूनही परमबीर सिंगांवर खंडणीखोरीचा आरोप

केतन तन्ना या व्यक्तीनेही परमबीर सिंह यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप केला आहे. परमबीर सिंह यांनी आपल्याकडून 1 कोटी 25 लाख रुपये उकळले. याप्रकरणी परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांची चौकशी व्हावी. याप्रकरणात आम्ही दोषी आढळलो तर आमच्यावर कारवाई करा, पण आम्हाला न्याय द्या, अशी मागणी केतन तन्ना यांनी केली आहे.

परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थ, पोलीस महासंचालक संजय पांडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांची चौकशी करण्यास पांडेंनी असमर्थता दाखवली. ठाकरे सरकारने परमबीर सिंह यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे परमबीर सिंह यांच्या आरोपांचा तपास करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र आता संजय पांडे यांनी चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे सरकारला त्यांच्याऐवजी दुसरा अधिकारी नेमावा लागेल.

संबंधित बातम्या : 

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, पोलीस अधिकाऱ्याकडून पहिला गुन्हा दाखल

परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला, अकोल्याच्या पोलीस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप

(Cricket Bookie Sonu Jalan accused extortion charges against Param Bir Singh)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.