Corona Vaccine Fruad | कोरोनावरील लस बनवतो सांगून डॉक्टरची 12 लाखांना फसवणूक, परदेशी नागरिकासह दोघांना अटक

कोव्हिड-19 (COVID-19) आजाराची लस (Corona Vaccine) बनवतो, असं सांगून भारतीय डॉक्टरची 12 लाखांची फसवणूक (Fraud) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी परदेशी नागरिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. कोव्हिड-19 लसीसाठी कच्चा माल पुरवण्याच्या नावाखाली या भामट्यांनी डॉक्टरची 12 लाखांची फसवणूक केली होती.

Corona Vaccine Fruad | कोरोनावरील लस बनवतो सांगून डॉक्टरची 12 लाखांना फसवणूक, परदेशी नागरिकासह दोघांना अटक
डॉक्टरची 12 लाखांनी फसवणूक
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 10:05 AM

मुंबई : कोव्हिड-19 (COVID-19) आजाराची लस (Corona Vaccine) बनवतो, असं सांगून भारतीय डॉक्टरची 12 लाखांची फसवणूक (Fraud) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी परदेशी नागरिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. कोव्हिड-19 लसीसाठी कच्चा माल पुरवण्याच्या नावाखाली या भामट्यांनी डॉक्टरची 12 लाखांची फसवणूक केली होती.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई सायबर सेलमध्ये कोरोना लसीच्या नावाखाली फसवणुकीचे नवे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी परदेशी नागरिकासह दोन आरोपींना अटक करुन लस बनवणाऱ्या बनावट कंपनीचा पर्दाफाश केला आहे. आरोपींकडून 10 मोबाईल, 2 सिमकार्ड, 1 पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.

मुंबई सायबर क्राइम ब्रँचच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, “कोव्हिड-19 लसीसाठी कच्चा माल पुरवण्याच्या नावाखाली डॉक्टरची 12 लाखांची फसवणूक करण्यात आली होती. आरोपीने सांगितले होते की लंडनमध्ये त्याची एक कंपनी आहे, ज्याची आयकॉनिक फार्मास्युटिकल आहे आणि ती निर्माता आहे. जे कोव्हिड-19 रोगासाठी लस बनवते.”

भारतीय डॉक्टरने 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर सायबर सेलच्या पथकाने नायजेरियन नागरिक आणि एका भारतीय नागरिकाला अटक केली आहे. या लोकांनी आणखी अनेक लोकांची फसवणूक केली आहे का, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

फेसबुक लाईव्ह करत 40 ते 50 बाटल्या सिरप प्यायला, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा थरारक बचाव

आक्षेपार्ह फोटोंवरुन तरुणाचे ब्लॅकमेलिंग, अकरावीतील विद्यार्थिनीचा गळफास

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.