Cyber crime : 55 वर्षांवरील व्यक्तींना फसवून घातला 2 मिलियन डॉलर्सचा गंडा, जाणून घ्या काय आहे ‘Hi Mum’कोड?

सायबर क्राइमद्वारे लोकांना फसवणाऱ्यांनी नवी क्लृप्ती शोधून काढली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 'Hi Mum' असे या स्कॅमचे नाव आहे. या स्कॅमद्वारे आत्तापर्यंत अनेक लोकांना एकूण 20 लाख डॉलर्सचा गंडा घालण्यात आला आहे. हा फ्रॉड करणारे भामटे ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य बनवून फसवत आहेत.

Cyber crime : 55 वर्षांवरील व्यक्तींना फसवून घातला 2 मिलियन डॉलर्सचा गंडा, जाणून घ्या काय आहे 'Hi Mum'कोड?
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 3:02 PM

मुंबई : ऑनलाइन भामट्यांनी सायबर क्राइमद्वारे (Cyber Scam) लोकांना फसवण्याची नवी क्लृप्ती शोधली आहे. परदेशात हे स्कॅम ‘ हाय मॉम ‘ (Hi Mum) या नावाने कुप्रसिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर मोबाईल फोन वापरणाऱे नागरिक विशेषत: ज्येष्ठ व्यक्तींना सतर्क (parents above 55 years age)राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या स्कॅमद्वारे आत्तापर्यंत अनेक लोकांना तब्बल 20 लाख डॉलर्सचा (2 million dollars) गंडा घालण्यात आला आहे. यामध्ये स्कॅम करणारे भामटे, अज्ञात मोबाईल नंबरवरून एखाद्या व्यक्तीच्या मेसेजिंग ॲपवर त्या व्यक्तीचा मुलगा अथवा मुलगी असल्याचा दावा करणारा मेसेज पाठवतात. त्यानंतर ते संबंधित व्यक्तीशी त्यांची मुलगा वा मुलगी बनून चॅट करतात. आपला फोन हरवल्याची बतावणी करत जुना नंबर डिलीट करून हा विशिष्ट (ज्यावरून मेसेज पाठवण्यात आला तो) नवा नंबर सेव्ह करण्यास सांगतात. पीडित व्यक्तीशी बोलणे सुरू झाल्यानंतर भामटे त्यांच्याकडे काही पैसे उधार मागतात अथवा त्यांना काही पेमेंट करण्यास सांगतात. त्यासाठी, नव्या मोबाईल नंबरवर अद्याप ऑनलाइन बँकिंग सुरू झाला नसल्याची बतावणी करत, ते पीडित व्यक्तीकडून पैसे मागतात.

ऑस्ट्रेलियाचे सायबर क्राइम स्क्वॉड कमांडर , डिटेक्टिव्ह सुप्रिटेंडंट मॅथ्यू क्राफ्ट यांनी याबद्दल माहिती दिली. जगभरातील आई – वडील ( विशेषत: 55 वर्षांवराली व्यक्ती) या स्कॅमला बळी पडले आहेत. यापूर्वी परदेशातील नागरिक ‘Hi Mum’या स्कॅमचे बळी ठरत होते, मात्र मे महिन्यापासून संपूर्ण ऑस्ट्रेलियातील नागरिकांनाही अशा पद्धतीने गंडा घातल्याच्या घटना वाढल्याचे समोर आले आहे, असे क्राफ्ट यांनी नमूद केले.

हे भामटे पैसे मागण्यासाठी मेसेजेसचाच वापर करतात, त्यामध्ये फोनवरून प्रत्यक्ष बोलणे होत नाही, असे क्राफ्ट यांनी सांगितले. जर तुम्हाला असा एखादा संदिग्ध मेसेज आला, विशेषत: सोशल मीडियाच्या मेसेजिंग ॲपवरून असा काही मेसेज आला तर सर्वप्रथम तुमच्या नातेवाईंकाशी बोला. आणि मेसेज करणारी व्यक्ती खरी आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्यांना तुम्हाला कॉल करण्यास सांगावे.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही महिन्यात या पद्धतीचा वापर करून ऑस्ट्रेलियामध्ये सुमारे 20 लाख डॉलर्स लुटण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, या स्कॅममध्ये फसवल्या जाणाऱ्यांमध्ये जास्त करूने 55 वर्षांवरील व्यक्तींचा समावेश आहे. त्यापैकी बरेच जण आई किंवा वडील आहेत, जे आपल्या मुलांची अडचण सोडवण्यासाठी त्वरित पैसे पाठवतात.

या स्कॅममधील फसवणुकीची सर्वात जास्त प्रकरणे ही न्यू साऊथ वेल्स (NSW)आणि व्हिक्टोरिया येथील असून त्यानंतर पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि क्लीन्सलँडचा नंबर लागतो. ‘Hi Mum’या स्कॅमद्वारे फसवणूक करणारे भामटे पैसे मिळाल्यानंतर त्याचे बँकेतील खात्यातून क्रिप्टो करन्सीमध्ये रुपांतर करून घेतात. त्यामुळे पीडित व्यक्तींना त्यांचे पैसे परत मिळण्याची संधीच उरत नाही. जे नागरिक या स्कॅमद्वारे फसवले गेले आहेत, त्यामध्ये पैसे गमावले आहेत, त्यांनी त्वरित आपल्या बँकेशी संपर्क साधावा तसेच पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.