सायबर भामट्यांची ‘ही’ आहे नवीन मोडस ऑपरेंडी; फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घ्या !

अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारांनी भलताच हैदोस माजवला आहे. हे गुन्हेगार नवनवीन तंत्र शोधून लोकांना फसवण्याचे गोरखधंदे सुरू ठेवत आहेत.

सायबर भामट्यांची 'ही' आहे नवीन मोडस ऑपरेंडी; फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घ्या !
सायबर गुन्हेगारीत वाढImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 12:06 AM

भारत देश ‘डिजिटल इंडिया’ (Digital India) बनला आणि शहरच नव्हे तर अगदी ग्रामीण भागापर्यंतही डिजिटल व्यवहाराला चालना दिली गेली. या ऑनलाइन व्यवहारांमुळे सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्या झाल्यात. मात्र त्याचवेळी ऑनलाईन व्यवहारांचा गैरफायदा घेणारे सायबर गुन्हेगारही (Cyber Criminal) डोके वर काढू लागले आहेत. अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारांनी भलताच हैदोस माजवला आहे. हे गुन्हेगार नवनवीन तंत्र शोधून लोकांना फसवण्याचे गोरखधंदे सुरू ठेवत आहेत. उत्तरप्रदेशमध्ये सध्या सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन फसवणुकीची नवीन मोडस ऑपरेंडी (Modus Operandi) अवलंबली आहे.

महानगरांतील सर्वसामान्य लोक शिकार

सायबर गुन्हेगारांनी विशेषतः मेट्रो शहरांमध्ये सर्वसामान्य लोकांना टार्गेट करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. आता नोएडाच्या एनसीआर प्रदेशातील ऑनलाइन फसवणूक उजेडात आली आहे. एकाच वेळी तब्बल पाच हजार लोकांना मेसेज पाठवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

तुमच्या गाडीचे चलान काटण्यात आले आहे. या चलनचा स्टेटस पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा, अशा आशयाचा मेसेज सर्व लोकांना त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

लिंकवर क्लिक करताच खात्यातून पैसे कट

ज्यावेळी त्या लोकांनी मोबाईल वरील लिंक वर क्लिक केले त्यावेळी पुढे जे काही घडले, या प्रकाराने सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली. सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बँक खात्यात हात घातला होता.

अनेकांच्या खात्यातून पैसे काढले गेल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईलवर धडकले. या मेसेजमुळे आपण अनोळख्या व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्याचा पश्चाताप सर्वांनाच झाला.

नोएडातील धक्कादायक प्रकार

नोएडाच्या सेक्टर-46 मधील एका सोसायटीमध्ये हा खळबळजनक प्रकार घडला आहे. लोकांनी त्यांना आलेल्या फेक मेसेजचा मोबाईल नंबर ट्रू कॉलरवर चेक केला, त्यावेळी त्या मोबाईल नंबरच्या नावाचा पार्किंग प्लस असा उल्लेख असल्याचे अनेकांना आढळून आले.

त्यात कुणा व्यक्तीचे नाव नव्हते. त्यामुळे आपल्याला कोणत्या गुन्हेगाराने फसवले, याचा उलगडा अनेकांना होऊ शकलेला नाही. झालेल्या फसवणुकीमुळे अनेकांनी यापुढे कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याची खूणगाठ मनाशी बांधली आहे.

अनेकांनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र त्यावर तपास सुरू आहे, एवढेच अनेकांना ऐकायला मिळत आहे. सायबर गुन्हेगारांनी खात्यातून हिसकावलेले पैसे परत कधी मिळणार? असा प्रश्न अनेकांना सतावतोय.

Non Stop LIVE Update
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका.
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.