AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नशिबानं इतकाही सूड उगवू नये, आर्थिक अडचणीमुळे किडनी विकायला निघाला, पण तिथेही… ऑफीस बॉयसोबत काय झालं?

दहिसरमधील ४५ वर्षीय एका व्यक्तीने किडनी विकण्यासाठी ऑनलाइन शोध सुरू केला. सायबर गुन्हेगारांनी त्याला किडनी खरेदीचे आमिष दाखवून लाखोंचा फ्रॉड केला. शस्त्रक्रियेच्या नावाखाली हप्त्यांमध्ये पैसे दिले जात असतानाच फसवणूक उघडकीस आली.

नशिबानं इतकाही सूड उगवू नये, आर्थिक अडचणीमुळे किडनी विकायला निघाला, पण तिथेही... ऑफीस बॉयसोबत काय झालं?
क्राईम न्यूजImage Credit source: social media
| Updated on: Jul 19, 2025 | 10:23 AM
Share

सध्या फसवणूक, फ्रॉडचे गुन्हे खूप वाढले असून त्यामुळे सर्वसामान्य नागिरक मात्र भरडले जात आहेत. अवघ्या काही क्षणांत आयुष्यभराची, कष्टाने जमवलेले पैसे गमावल्यामुळे लोक हैराण झाले असून अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार मुंबईतील पूर्वउपनगरांतील दहिसरमध्ये घडला असून पैशांसाठी किडनी विकायला निघालेल्या इसमाचीच फसवणूक करून त्याच्याकडून अडीच लाख रुपये लुटण्यात आल्याचे उघड झाल. या घटनेत फसवणूक करणाऱ्याविरुद्ध दहिसर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेली पीडित व्यक्ती 45 वर्षांची असून तो इसम दहिसरमध्ये संयुक्त कुटुंबात राहतो. तो अंधेरीतील एका कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करतो. मात्र त्याच्या घरी बऱ्याच अडचणी होत्या आणि त्याला पैशांची खूप गरज होती. मात्र पैशांची काहीच सोय ना झाल्याने त्या इसमाने अखेर त्याची किडनी विकण्याचा निर्णय घेतला. आणि किडनी स्वीकारतील अशा रुग्णालयांचा ऑनलाइन शोध सुरू केला.

सायबर गुन्हेगाराने केली लाखोंची फसवणूक

हा शोध घेत असताना त्याला अशी माहिती मिळाली की दिल्लीतील एका रुग्णालयाने किडनी खरेदी केली आहे. त्याने शोध घेत फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला. त्याच्या कॉलला उत्तर देणाऱ्या व्यक्तीने पीडित इसमाचा फोन नंबर आणि वैयक्तिक माहिती लिहून ठेवली आणि तो परत कॉल करेल असे सांगितले. अखेर 16 जुलै रोजी तक्रारदारा व्यक्तीला ला एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल आला. कॉलरने तक्रारदाराला त्याचे नाव, वय, पत्ता आणि रक्तगट विचारले.

1 कोटींचे आमिष दाखवून 3 लाख लुटले

त्या व्यक्तीने तक्रारदाराला सांगितले की, त्याला त्याची किडनी विकण्यासाठी 1 कोटी रुपये मिळतील पण शस्त्रक्रियेसाठी 2.95 लाख रुपये द्यावे लागतील. हे ऐकल्यावर त्या तक्रारदार ऑफिस बॉयने सांगितले की त्याच्याकडे इतके पैसे नाहीत. मात्र ते ऐकून फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याला हे पैसे हप्त्यांमध्ये देण्यास प्रोत्साहित केले. त्यानंतर ऑफिस बॉयला तीन बँक खाते क्रमांक देण्यात आले. पीडित इसम फसवणुकीच्या जाळ्यात अडकला आणि पाहता पाहता त्याने अनेक हप्त्यांमध्ये 2.95 लाख रुपये त्या इसमाला दिले.

त्यानंतर, ऑफिस बॉयने त्याला शस्त्रक्रियेसाठी कुठे यायचे आहे हे वारंवार विचारले, पण त्याचे उत्तर न देता, पण कॉलरने त्याच्याकडून आणखी पैसे मागितले. ऑफिस बॉयने त्याला सांगितले की त्याने आधीच खूप पैसे उधार घेतले आहेत आणि तो आता पैसे देऊ शकणार नाही . तरीही समोरून काहीच प्रतिसाद मिळाल नाही, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पीडित इसमाला लक्षात आलं आणि त्यांनी दहिसर पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार नोंदवली. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.