AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 मिनिटांत बलात्कार अन् हत्या, राहुलने एक दिवस आधीही… IRS ऑफीसरच्या मुलीच्या मारेकऱ्याचं हादरवणारं कृत्य उघड

IRS Officer's Daughter Murder Case Update : कैलास हिल्स येथील आयआरएस अधिकाऱ्याच्या ऑफीसरच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपी राहुल मीनाला दिल्ली पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अटक केली. ऑनलाइन गेमिंगचा नाद आणि त्या ऑफीसरचा बदला घेण्यासाठी आरोपी राहुलने हे कृत्य केलं. एवढंच नव्हे तर त्याने 1 दिवस आधी..

40 मिनिटांत बलात्कार अन् हत्या,  राहुलने एक दिवस आधीही...  IRS ऑफीसरच्या मुलीच्या मारेकऱ्याचं हादरवणारं कृत्य उघड
आरोपी राहुल
| Updated on: Apr 23, 2026 | 9:20 AM
Share

Delhi Murder Case : ईस्ट ऑफ कैलाशच्या कैलाशा हिल्स येथे IRS ऑफीसरच्या 22 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण राजधानी हादरली. मात्र दिल्ली पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत ही मर्डर मिस्ट्री उलगडली आणि आरोपी राहुल मीनायाला द्वारका येथील हॉटेलमधून बेड्या ठोकल्या. मात्र आता या केसमध्ये आणखी नवनवे, धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपी राहुलने 40 मिनिटांत तरूणीवर बल्ताकार करून तिची हत्या केली. आरोपीला पकडण्यासाठी १५ पथके तयार करण्यात आली होती. त्यानंतर त्याला द्वारका येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली असं दिल्ली पोलिसांच्या दक्षिण विभागाचे सहआयुक्त विजय कुमार यांनी टीव्ही9 शी बोलताना सांगितलं.

ऑनलाइन गेमिंग आणि सट्टेबाजीच्या व्यसनामुळे आरोपी राहुल लोकांकडून पैसे उसने घेत असे. बलात्कार आणि हत्येचा हा भयानक गुन्हा करण्यापूर्वी त्याने आपला फोन 10 हजार रुपयांना विकला होता. एवढंच नव्हे तर गुन्ह्याच्या एक दिवस आधी त्याने अलवरमध्येही एका महिलेवर लैंगिक अत्याचार केला होता, असं उघड झाल आहे. तर कैलाश हिल्स येथे IRSअधिकाऱ्याच्या मुलीची हत्या केल्यावर त्याने अडीच लाख रुपये चोरले होते. ते पैसे परत मिळवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

मृत मुलीच्या पालकांनी बुधवारी सकाळी पोलिसांना माहिती दिली. त्या दिवशी सकाळी ते फिरायला गेले होते. मात्र घरी परत आल्यावर त्यांना त्यांची मुलगी जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं, असं सहआयुक्त विजय कुमार यांनी सांगितलं. कुटुंबाशी बोलल्यानंतर, प्राथमिक तपासात राहुल मीनाच्या दिशेने संशयाची सुई वळली. त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला. राहुल हा संबंधित अधिकाऱ्याच्या घरी काम करायचा तेव्हा, घरगुती वस्तू मागवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पैशांमध्ये तो हेराफेरी करायचा. त्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं, त्याचाच बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. .

40 मिनिटांत बलात्कार आणि हत्या

” याप्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी राहुल सकाळी 6:30 वाजता कॉलनीत आल्याचे आढळून आलं. तो सकाळी 6:39 च्या सुमारास त्या अधिकाऱ्याच्या घरात शिरला. त्यानंतर त्या तरूणीवर अत्याचार व तिची हत्या करून 7:20 च्या सुमारासा तो घरातून फरार झाला. अवघ्या 30 मिनिटांत तो गुन्हा करून बाहेर पडला” असं पोलिसांनी सांगितलं.

12 तासांत आरोपीला अटक

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणीवर बलात्कार आणि तिची हत्या करणारा आरोपी राहुल याला पकडण्यासाठी 15 पथकं तयार करण्यात आली होती. ही पथके राजस्थान आणि दिल्लीच्या विविध भागांमध्ये पाठवण्यात आली . मात्र अवघ्या 12 तासांच्या आता, आरोपी राहुल याला संध्याकाळीक, द्वारका येथील एका ओयो हॉटेलमधून अटक करण्यात आली. सध्या त्याची चौकशी सुरू असून त्याच्या विरोधात ठोस पुरावे आहेत. “त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करू” असं पोलिसांनी नमूद केलं.

एक दिवस आधीही केला अत्याचार

दिल्ली पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राहुल गुन्हा केल्यानंतर आपली पॅन्ट आणि बूट बदलताना दिसला होता. याचप्रकरणात आणखीही एक धक्कादायक माहिती उघड झाली. आरोपी राहुल याने , मंगळवारी देखील अलवर येथे एका महिलेनर लैंगिक अत्याचार केला होता. त्यामुळे, त्याची मानसिकताही तशीच असण्याची शक्यता आहे.तिथे बलात्काराचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राहुलने आयआरएस अधिकाऱ्याच्या घरात काम केल्यामुळे, त्याला तिथली खडानखडा माहिती होती आणि त्याने त्याच माहितीचा गैरफायदा घेतला. घरकाम करणाऱ्या बाईसाठी एक अतिरिक्त चावी ठेवलेली होतीस हेही त्याला माहीत होतं. मृत तरूणीची खोली वरच्या मजल्यावर होती हे त्याला माहीत होते, घरात घुसून त्याने गुन्हा केला. नंतर घरातून अडीच लाख रुपये घेऊन फरार झाला.

मृत मुलीच्या वडिलांनी त्याला कामावरून काढून टाकलं होतं. त्यामुळेच नोकरीवरून काढून टाकल्याचा बदला घेण्यासाठी आणि आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी राहुल मीनाने हा गुन्हा केला. तपासात या प्रकरणात केवळ एकच संशयित समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात बलात्कार, हत्या आणि दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.