AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यवतमाळातील डॉक्टरचे हत्यारे जेरबंद, तीन जणांच्या मुसक्या आवळल्या

यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्याचा 10 नोव्हेंबरला खून झाला होता. याप्रकरणी यवतमाळ पोलिसांनी तीन आरोपींना 13 नोव्हेंबरला अटक केली. महावीरनगरातील ऋषिकेश सवळे (वय 23), सावित्रीबाई फुले सोसायटीतील प्रवीण गुंडजवार (वय 24) अशी आरोपींची नावे आहेत. तसेच एका अल्पवयीन बालकाचा आरोपींमध्ये समावेश आहे.

यवतमाळातील डॉक्टरचे हत्यारे जेरबंद, तीन जणांच्या मुसक्या आवळल्या
yavatmal medical college
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 11:21 AM
Share

यवतमाळ : यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्याचा 10 नोव्हेंबरला खून झाला होता. याप्रकरणी यवतमाळ पोलिसांनी तीन आरोपींना 13 नोव्हेंबरला अटक केली. महावीरनगरातील ऋषिकेश सवळे (वय 23), सावित्रीबाई फुले सोसायटीतील प्रवीण गुंडजवार (वय 24) अशी आरोपींची नावे आहेत. तसेच एका अल्पवयीन बालकाचा आरोपींमध्ये समावेश आहे. दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त

अशोक पाल असे खून झालेल्या शिकाऊ डॉक्टरचं नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील असून यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. मुलींच्या वसतिगृहाजवळ आरोपींच्या दुचाकीचा अशोकला धक्का लागला होता. यावरून झालेल्या वादात अशोकवर चाकूने वार करण्यात आले. जखमी झालेल्या अशोकचा घटनास्थळीत मृत्यू झाला. यवतमाळ पोलिसांनी शनिवारी पहाटे तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

आरोपींना अटक करणाऱ्यांना एक लाख

तीनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती यवतमाळचे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी दिली. गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि दुचाकी जप्त करण्यात आली. मेडिकलचे अधीक्षक डॉ. मिलिंद कांबळे यांच्या तक्रारीवरून आरोपींना अटक करण्यात आली होती. तिघांना अटक करणाऱ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. धमकी देणाऱ्या राजकीय नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली आहे. शिवाय महाविद्यालय परिसरात येण्यावर बंदी घालण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

वैद्यकीय शिक्षण संचालकांची महाविद्यालयाला भेट

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीम म्हैसकर यांनी यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या मान्य होतील, असे आश्वासन दिले. पाच सदस्यीच चमूने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. अंकित गौरखेडे यांनी मृतकाच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.

नागपुरातील मेडिकलची रुग्णसेवा प्रभावित

अशोक पालच्या हत्येतील आरोपीला अटक करा, या मागणीसाठी नागपुरातील मेडिकल, मेयोत मार्डच्या डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. यामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली होती. निवासी डॉक्टरांनी मेडिकलसमोर निदर्शने केली होती. या कामबंद आंदोलनात मेडिकलचे 200, तर मेयोचे 150 इंटर्न सहभागी झाले होते. त्यामुळं वॉर्डातील रुग्णांची जबाबदारी परिचारिकांवर आली होती.

इतर बातम्या :

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.