Dombivali Crime : दुकान मालकाने विश्वासाने दागिने हाती दिले, पण लाखोंचे दागिने पाहून त्याची नियत फिरली !

मालकाने विश्वासू नोकराला दागिने हॉलमार्क करण्यासाठी पाठवले. मात्र नोकर हॉलमार्क केंद्रात पोहचलाच नाही. त्याचा कुठेही थांगपत्ता लागेना. नोकराता फोनही बंद होता.

Dombivali Crime : दुकान मालकाने विश्वासाने दागिने हाती दिले, पण लाखोंचे दागिने पाहून त्याची नियत फिरली !
डोंबिवलीत नोकरानेच घातला सोनाराला गंडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 6:53 PM

डोंबिवली / 1 सप्टेंबर 2023 : पैसा, संपत्ती पाहून भल्याभल्यांची नियत फिरते. याचाच प्रत्यय डोंबिवलीतील एका घटनेवरुन आला आहे. काही वर्षे इमानदारीने सोनाराच्या दुकानात काम करत असलेल्या नोकरानेच मालकाच्या 12 लाखाच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. 50 हजाराचे कर्ज फेडण्यासाठी दुकान मालकाचे 12 लाखांहून अधिक किंमतीचे दागिने घेऊन नोकर रफूचक्कर झाला. मालकाने रामनगर पोलीस ठाणे गाठत नोकराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तीन तासातच ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून नोकराला बेड्या ठोकल्या. विक्रम गोपाळ रावल असे अटक केलेल्या नोकराचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडील मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.

दुकानमालकाने हॉलमार्कचे दागिने घेऊन नोकराला पाठवले होते

डोंबिवली पूर्व भागातील नेहरु रस्त्यावरील बसंतीलाल चपलोत यांचे प्रगती ज्वेलर्स नावाने दुकान आहे. या दुकानात विक्रम गोपाळ रावल हा काही वर्षापासून विश्वासाने काम करत होता. विक्रम विश्वासू असल्याने दुकान मालक बसंतीलाल यांनी गुरुवारी संध्याकाळी विक्रमकडे दुकानातील 12 लाख 72 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हॉलमार्क करण्यासाठी दिले. ते इच्छित स्थळी नेणे विक्रमकडून अपेक्षित होते. मात्र विक्रम गुरुवारी संध्याकाळी दुकानातून सोन्याचा ऐवज घेऊन बाहेर पडला, पण तो इच्छित स्थळी पोहचलाच नाही. मालक बसंतीलाल यांनी सदर ठिकाणी संपर्क केला असता, तो पोहचला नसल्याचे कळले.

दागिने घेऊन नोकर पसार झाला

बसंतीलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विक्रमची परिसरात शोधाशोध केली. तो कुठेच आढळला नाही. त्याचा मोबाईलही बंद होता. त्यानंतर विक्रमने विश्वासघात करुन सोन्याचा ऐवज लांबवला असल्याची खात्री पटल्यावर बसंतीलाल यांनी रामनगर पोलीस ठाण्यात विक्रम विरुध्द तक्रार दाखल केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तयार करण्यात आली. चपलोत यांच्या दुकान परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात आले.

हे सुद्धा वाचा

शहरातील सर्व रस्त्यांवर पोलिसांनी एकाचवेळी तपास सुरू केला. त्यावेळी तांत्रिक माहितीच्या आधारे विक्रम ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांना पाहताच विक्रम पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्याच्याकडून 9 लाखाच्या सोन्याच्या बांगड्या, दोन सोनसाखळी असा 12 लाख 72 हजाराचा ऐवज जप्त केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीची चौकशी केली असता 50 हजाराचे कर्ज फेडण्यासाठी आपण ही चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

Non Stop LIVE Update
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.