AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुळ्यात एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न, नगरसेवकाच्या घरी चोरीचा डाव फसला

सिंधी समाजाच्या वसाहतीत पाच अज्ञात तरुणांनी चेहऱ्यावर मास बांधत हातात कटर, हत्यार साहित्य वापरत नगरसेवकाच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला.

धुळ्यात एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न, नगरसेवकाच्या घरी चोरीचा डाव फसला
| Updated on: Feb 10, 2021 | 12:53 PM
Share

धुळे : दोंडाईचा शहरात सध्या चोर आणि चोरींच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे (Dondaicha City Robbery Cases Increase). त्याचाच एक भाग म्हणून आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास गजबजलेल्या सिंधी समाजाच्या वसाहतीत पाच अज्ञात तरुणांनी चेहऱ्यावर मास बांधत हातात कटर, हत्यार साहित्य वापरत नगरसेवकाच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण, घरात त्यांची सून जागी झाल्याने चोरीचा डाव फसला आणि पुढील अन्य चार ठिकाणांपैकी दोन ठिकाणी मोटरसायकल हाती आल्यावर पेट्रोल अभावी रस्त्यावर सोडावी लागली. तर दोन जणांकडे मात्र, त्यांनी घटनेला तडीस नेले आहे (Dondaicha City Robbery Cases Increase).

त्यामुळे गजबजलेल्या वसाहतीत असा प्रकार होत असेल तर विखुरलेल्या कॉलनी परिसरात हे चोर काय परिस्थिती निर्माण करु शकतात, या विचाराने सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. म्हणून नव्यानेच दोंडाईचा पोलीस स्टेशनला रुजू झालेले पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेसाहेब यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांनी चोरींच्या घटनांसह इतरही गुन्ह्यांवर अंकुश मिळवावा, अशी रास्त अपेक्षा गावातील जागृत नागरिक करत आहेत.

सिंधी कॉलनीत आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाच अज्ञात तरुण चेहऱ्यावर मास बांधून, हातात कटर वगैरेसह साहित्य घेत धाडसी चोरी करण्याच्या इराद्याने आली होती. नगरसेवकाच्या घरी त्यांनी गेटचे कडीकुलूप तोडून आत प्रवेश मिळवला. पण सुनबाई वेळेवर जागे झाल्याने त्यांचा डाव फसला आणि ते उलट्या पायाने पुढे सरकले. मात्र, यावेळी त्यांनी कॉलनीतील दोन, सर्वसामान्य परिवाराच्या घरी चोरींच्या घटनेला तडीस नेले आहे. तर अन्य दोन ठिकाणी हाती आलेल्या मोटारसायकल पेट्रोल अभावी कॉलनी बाहेरील रस्त्यावर सोडून दिल्या आहेत, अशी माहिती आहे.

यावेळी जनमतच्या टीमने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. यावेळी चोरांनी सुरुवातीला समाजाचे रोडवर असलेले प्रेमकुटीर मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. पण, तिथे त्यांना काही हाती आले नाही. म्हणून त्यांनी सामानाची नासधूस करत खुर्च्या अस्तव्यस्त फेकल्या. त्यानंतर नगरसेवक किशनचंद दोधेजा यांच्या घराकडे वळले. घराचे गेट तोडत ते पुढे कै. घनश्यामराय सतीषराय शर्मा यांच्या पत्नी भुसावळला गेलेली असल्याने, त्यांना बंद घर सापडले. तेथेही त्यांनी कपाटे उघडली, टी.व्ही. रुमची झडती घेत हातसाफ केला आहे.

त्यानंतर पुढे राजेश्वर उर्फ रज्जू किसन कुकरेजा यांच्या घरातून पंधरा हजाराच्या आसपास रोकड लंपास केली आहे. तसेच, शेवटी भजनलाल एजन्सीचे मालक ध्यानचंद भजनलाल केसवानी यांच्या घराकडे मोर्चा वळवला. त्यांनी लोखंडी गेटचे कुलूप तोडले. घरापुढे असलेल्या युनिकार्न नावाची मोटरसायकल आणि बजाज डिस्कवर नावाची मोटारसायकल घेऊन जाणाच्या तयारीत होते. मात्र, ध्यानचंद केसवानी यांच्या पत्नीच्या लक्षात आले आणि त्यांनी लागलीच आरडाओरड करत घरच्यांना उठवले. त्यावेळी चोरांनी पितळ उघडे पडल्याचे पाहत गाडी घेऊन पळ काढला (Dondaicha City Robbery Cases Increase).

मग घरातील मंडळींनी आजुबाजूच्या, शेजाऱ्यांची मदत घेत त्यांचा पाठलाग केला. तेव्हा कुठे जावून त्यांनी गावाबाहेरील रस्त्यावर शेतात चालू गाड्या अंधाऱ्यात फेकून पळ काढला. तेव्हा गाडी मालकांनी गाड्या हस्तगत करत सुटकेचा श्वास घेतला. याबाबत दोंडाईचा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत, पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

सदरची घटना संपूर्ण सीसीटीव्हीमध्ये कैद

सध्या दोंडाईचा पोलीस स्टेशनला नव्यानेच अधिकारी म्हणून ज्ञानेश्वर वारे रुजू झाले आहेत. गावात मागील तीनचार दिवसात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. म्हणून नवीन साहेबांनी चोरांच्या सलामीला उत्तर देण्यासाठी रात्रींची ग्रस्त वाढवावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

Dondaicha City Robbery Cases Increase

संबंधित बातम्या :

प्लास्टिकच्या बॅगमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह, अ‌ॅसिड टाकून जाळण्याचाही प्रयत्न, कोल्हापुरात खळबळ

मैत्रिणीसोबत जवळीक वाढवल्याचा राग, नाशिकच्या मित्राकडून नवी मुंबईत तरुणाची हत्या

कुख्यात गँगस्टर इजाज लकडावाला 2 कोटींच्या खंडणीचं प्रकरण भोवलं, ठाणे पोलिसांकडून अटक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.