प्लास्टिकच्या बॅगमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह, अ‌ॅसिड टाकून जाळण्याचाही प्रयत्न, कोल्हापुरात खळबळ

कोेल्हापूरमध्ये राजाराम तलावात प्लास्टिक बॅगमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (kolhapur women murder half dead body)

प्लास्टिकच्या बॅगमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह, अ‌ॅसिड टाकून जाळण्याचाही प्रयत्न, कोल्हापुरात खळबळ
पोलिसांनी अशा प्रकारे घटनास्थळाची पाहणी केली.

कोल्हापूर : शहरातील राजाराम तलावात प्लास्टिक बॅगमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह (kolhapur women murder) आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आढळलेला मृतदेह अर्धवट असून तो अ‌ॅसिड टाकून जाळण्याचाही प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. (kolhapur women murder,half dead body found)

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील राजाराम तलावाच्या परिसरात काही नागरिक सकाळी फिरायला गेले होते. यावेळी त्यांना तलावात प्लास्टिकच्या बॅगमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आला. मृतदेह आढळल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती होताच फिरायला आलेल्या नागरिकांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. राजारामपुरी येथील पोलिसही घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.

त्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढून त्याची तपासणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेह अ‌ॅसिड टाकून जाळण्याचाही प्रयत्न केल्याची शक्यता आहे.

दरम्यान मृत महिलेची ओळख पटलेली नसून पोलिसांनी शवविच्छेदनसाठी मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच  महिलेचा मृत्यू किंवा खुनाबद्दल अधिकची माहिती समजेल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

दारुची बाटली आणायला नकार, मित्राचा खून

दारुची बाटली आणायला नकार दिल्याने मित्रांनी मित्राचा धारधार शस्त्रांनी भोसकून खून केल्याची घटना 4 फेब्रुवारी रोजी घडली. कोल्हापूरच्या शिरोली दर्ग्यानजवळ ही भयंकर घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गांधीनगर भागात राहणाऱ्या मित्रांच्या गँग पुणे-बँगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पीर दर्ग्याच्या पाठीमागे पार्टीचं नियोजन केलं होतं. परंतु अगोदरच दारुच्या नशेत असलेल्या समीर नदाफ आणि योगेश साखरे यांनी अमित राठोडला दारुची बाटली आणायला सांगितली होती. अमितने दारुची बाटली आणायला नकार दिल्याने नदाफ आणि योगेशला राग अनावर झाला होता. त्यांनी अमितच्या पोटात धारदार शस्त्रांनी वार करुन त्याचा खून केला होता.

इतर बातम्या :

दुकानदार वळेपर्यंत सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स गुल, मुंबईतील चोरटा सीसीटीव्हीत कैद

इंटरनेटवर नोकरीची जाहिरात, तरुणी सेक्स रॅकेटमध्ये अडकल्या!, नागपूर पोलिसांकडून आरोपी गजाआड

पुणे नगर हायवेवर दिवसा ढवळ्या गोळीबार, लोणीकंद परिसरात भीतीचं वातावरण

(kolhapur women murder,half dead body found)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI