AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govind Barge Death : उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, पूजा गायकवाडच्या अडचणी आणखी वाढल्या, दिवाळीही..

बीडमधील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणाला महिन्याभराहून अधिक काळ उलटून गेला आहे. याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नर्तकी पूजा गायकवाड हिची दिवाळीदेखील तुरूंगाच्या गजाआडच जाणार आहे. तिच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Govind Barge Death : उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, पूजा गायकवाडच्या अडचणी आणखी वाढल्या, दिवाळीही..
गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणImage Credit source: social media
| Updated on: Oct 18, 2025 | 2:54 PM
Share

बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यूमुळे अख्खं राज्य हादरलं. कलाकेंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिच्या प्रेमात असलेल्या गोविंद बर्गे यांनी साधारण महिन्याभरापूर्वी आयुष्य संपवलं. पूजा हिने केलेलं ब्लॅकमेलिंग तसंच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, यामुळे गोविंद यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणात पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाडला ताब्यात घेतलं होतं, त्यानतंर तिची रवानगी तुरूंगात करण्यात आली. आत याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिन्याभरापासून तुरूगांच्या गजाआड असलेल्या पूजाची दिवाळीदेखील तुरूंगातच जाणार आहे. कारण न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पूजाच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत.

काय आहे प्रकरण ?

बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे पत्नी, मुलं, कुटुंबीय यांच्यासह रहात होते. मात्र विवाहीत असूनही वर्ष-दीड वर्षापूर्वी ते पूजाच्या प्रेमात पडले. कलाकेंद्रात झालेल्या ओळखीचे मैत्रीत व नंतर प्रेमात रुपांतर झाले. पूजाचे गोविंदशी प्रेमसंबंध तर सुरू झाले पण तिच्यासाठी ते फक्त कस्टमर होते, ज्याच्याकडून महागड्या वस्तू, पैसे, सोनं-नाणं, जमीन वगैरे उकळता येईल. वर्षभराच्या काळात गोविंद यांनी पूजाला महागडे मोबाईल, दागिने, पैसे, मालमत्ता बरंच काही घेऊन दिलं, बक्कळ पैसा खर्च केला. मात्र एवढं करूनही पूजाची नजर बर्गे यांच्या गेवराईतील बंगल्यावर पडली. तो बंगला माझ्या नावे करा असा तगादा दिने गोविंदकडे लावला, तसेच माझ्या भावाच्या नावे जमीन करून द्या अशीही मागणी तिने केली.

पण बर्गे यांना ते मान्य नव्हतं. त्यानंतर त्यांच्यातील वाद खरा विकोपाला गेला. पूजाने हळूहळू त्यांच्याशी बोलणं कमी केलं, फोन उचलायची नाही, तरीही गोविंद बधले नाहीत. हे पाहून तिने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. खोट्या गुन्ह्यात अडकवेन , अत्याचार केला असा आरोप करेन अशा धमक्या तिने गोविंद यांना दिल्या. आपण जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिचं हे रूप पाहून गोविंदला धक्का बसला, तरीही त्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केवला, मात्र तिने काहीच ऐकले नाही.

Beed Crime Govind Barge Death : जिच्या प्रेमात दिला जीव तिच्यासाठी गोविंद फक्त… पूजा गायकवाडची अख्खी कुंडलीच समोर ! नातं कसं झालं सुरू ?

तर गोविंद यांचा जीव वाचला असता

ज्या रात्री गोविंद यांचा मृत्यू झाला, त्याआधी संध्याकाळी ते पूजाला भेटण्यासाठी तिच्या सासुरे गावी, घरी गेले, मात्र ती तिथे नव्हती, फोन उचलत नव्हती. तिच्या आईनेही त्यांना फार प्रतिसाद दिला नाही, अखेर गोविंद यांनी व्हिडीओ कॉल करत आत्महत्येचा इशारा दिला. मात्र समोरून कोणीच प्रतिसाद दिला नाही. हे पाहून गोविंदचा ताप वाढला, ते रागातच कारमध्ये बसून निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी त्याच कारमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. गोविंद यांनी कॉल केल्यावर पूजा त्यांच्याशी बोलली असती तर कदाचित त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं नसतं आणि त्यांचा जीव वाचला असता अशी चर्चा सुरू होती.

पूजाला जामीन नाहीच

याप्रकरणी गोविंद बर्गेच्या मेहण्याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेतलं.तिच्यामुळेच गोविंदचा जीव गेला असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. तिला आधी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले, नंतर न्यायलयात हजर केल्यावर न्यायलयाने तिची रवानगी तुरूंगात केली. तिने पुन्हा जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तिला जामीन मिळू नये यासाठी जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत बाजू मांडली. “जर आरोपी पूजा गायकवाडला जामीन मंजूर केला, तर समाजात एक अत्यंत चुकीचा संदेश जाईल. अशा महिलांकडून पुरुषांची आर्थिक, मानसिक छळवणूक होण्याची शक्यता आणखी वाढेल ” असेही वकिलांनी नमूद केले.

Beed Crime Govind Barge Death : तर गोविंद बर्गे यांचा जीव वाचला असता, शेवटचा व्हिडीओ कॉल कोणाला ?

न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत पूजाचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे तिचा तुरूंगातील मुक्काम वाढला असून दिवाळी देखील गजाआडच जाणार आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.