निर्मनुष्य रस्त्यावर ‘डान्सिंग’ अ‍ॅम्ब्युलन्स, तिघा तरुणांसह अश्लील कृत्य करताना तरुणी रंगेहाथ

निर्मनुष्य भागात उभी रुग्णवाहिनी बंद असूनही हलत-डुलत असल्यामुळे रहिवाशी चक्रावले आणि त्यांनी पोलिसांना बोलावले (Dancing Ambulance vulgar act)

निर्मनुष्य रस्त्यावर 'डान्सिंग' अ‍ॅम्ब्युलन्स, तिघा तरुणांसह अश्लील कृत्य करताना तरुणी रंगेहाथ
प्रतिकात्मक फोटो

लखनौ : कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णवाहिका एखाद्या रुग्णासाठी कशी जीवनदायिनी आहे, हे कोणीही सांगेल. मात्र अ‍ॅम्ब्युलन्सच्या आडून अश्लील कृत्य करणाऱ्या काही जणांचा निर्लज्जपणा समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये चक्क रुग्णवाहिकेत तिघा तरुणांसह अश्लील कृत्य करताना एका तरुणीला रंगेहाथ पकडण्यात आले. चौघांवर गुन्हा दाखल करुन तुरुंगात पाठवण्यात आले आहे, तर रुग्णवाहिकाही पोलिसांनी जप्त केली आहे. (Girl arrested along with Three Men found in Dancing Ambulance doing vulgar act)

निर्मनुष्य भागात अ‍ॅम्ब्युलन्स उभी

पीके चित्रपटात आमीर खानने पाहिलेली डान्सिंग कार सर्वांनाच लक्षात असेल. असाच काहीसा अनुभव वाराणसीमधील रामनगर भागात राहणाऱ्या रहिवाशांना आला. सुजाबाद पोलीस चौकीजवळ एका निर्मनुष्य भागात अ‍ॅम्ब्युलन्स उभी होती. ही रुग्णवाहिनी बंद असूनही हलत-डुलत असल्यामुळे रहिवाशी चक्रावले. बराच वेळ होऊन गेल्यानंतरही अ‍ॅम्ब्युलन्स जागेवरुन न हलल्यामुळे लोकांचा संशय वाढला. त्यामुळे पोलिसांना बोलावून तपास करण्यात आला.

चौघांनाही तुरुंगवारी

पोलिसांनी रुग्णवाहिकेचे दार उघडायला लावले, तेव्हा सर्वांचीच बोटं तोंडात गेली. कारण आतमध्ये एक युवती आणि तिघे तरुण होते. चौघं जण बंद रुग्णवाहिकेत अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप आहे. सार्वजनिक स्थळी लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौघांची रवानगी तुरुंगात केली. तर रुग्णवाहिकाही पोलिसांनी जप्त केली आहे. आज तक वृत्तवाहिनीने यासंदर्भात बातमी दिली आहे.

खासगी रुग्णालयाची अ‍ॅम्ब्युलन्स

सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याच्या आरोपाखाली चौघांवर कारवाई केल्याची माहिती कोतवाली सर्कलचे एसीपी प्रवीण सिंह यांनी दिली. मंडुआडीह भागातील गंगा सेवा सदन या खासगी रुग्णालयाची ही अ‍ॅम्ब्युलन्स होती. रुग्णालय प्रशासनाने ती एका तरुणाला भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिली होती. या रुग्णालयाविरोधात आधीही काही तक्रारी आल्या असून त्यांचा तपास सुरु आहे.

कोरोना काळात अ‍ॅम्ब्युलन्स चालकांची मनमानी

कोरोना काळात रुग्णवाहिकांविरोधातही अनेक तक्रारी आलेल्या आहेत. नागरिकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत मनमानी लूट करत असल्याचा आरोप वारंवार केला जातो. इतकंच नाही तर रुग्णवाहिकेतच छेडछाड किंवा लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत.

संबंधित बातम्या :

फेसबुकवर प्रपोज, आई-वडिलांना भेटवण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, 25 मित्रांकडून गँगरेप

बांद्रा बँडस्टँडला 20 वर्षीय तरुणीवर गँगरेप, बॉयफ्रेण्डसह तिघा जणांना अटक

(Girl arrested along with Three Men found in Dancing Ambulance doing vulgar act)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI