बीएच्या विद्यार्थिनीची हत्या, मृतदेह नाल्याजवळच्या झुडपात, आजोबांच्या मित्रानेच जीव घेतल्याचा संशय

पीडितेच्या आजीच्या घरी आजोबांचा मित्र सिंहराजचा फोन आला. 50 वर्षीय संशयित आरोपी सिंहराज हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. पीडितेच्या कॉल रेकॉर्डमध्ये शेवटचा फोन सिंहराजचा असल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे.

बीएच्या विद्यार्थिनीची हत्या, मृतदेह नाल्याजवळच्या झुडपात, आजोबांच्या मित्रानेच जीव घेतल्याचा संशय
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 1:19 PM

नवी दिल्ली : बीएच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दिल्लीला लागून असलेल्या, हरियाणातील फरिदाबाद शहरात हा प्रकार घडल्याची माहिती. हत्येनंतर तरुणीचा मृतदेह आग्रा कॅनॉलच्या झुडपात फेकून देण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे 50 वर्षीय संशयित आरोपी हा तरुणीच्या आजोबांचा मित्र आहे.

काय आहे प्रकरण?

मयत विद्यार्थिनीच्या मावशीने सांगितले की, पीडिता तिच्या आजीच्या घरी जायला निघाली होती, पण ती तिथे न पोहोचल्यामुळे शोधाशोध सुरु झाली. त्याच वेळी आरोपीने मुलीच्या कुटुंबीयांना फोन करुन माहिती दिली. जवळपास आठवड्याभरापासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह पोलिसांना सातव्या दिवशी नाल्यात सापडला.

तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोपीचा दावा

मुलीच्या मावशीने सांगितले की, 31 डिसेंबर रोजी तिची भाची फरिदाबादच्या सेक्टर-18 येथून भूपानी गावात तिच्या आजीच्या घरी निघाली होती. ती पोहोचली नाही, मात्र आजीच्या घरी एक फोन आला. हा फोन आरोपीचा होता. आपण मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे त्याने सांगितले.

पीडितेच्या आजीच्या घरी आजोबांचा मित्र सिंहराजचा फोन आला. 50 वर्षीय संशयित आरोपी सिंहराज हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. पीडितेच्या कॉल रेकॉर्डमध्ये शेवटचा फोन सिंहराजचा असल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे.

आरोपीचा शोध सुरु

आपण तरुणीसोबत दुष्कृत्य करुन तिची हत्या केल्याचं आरोपीने सांगितलं. त्यानंतर त्याने आपला फोन स्विच ऑफ केला. पोलिसांनी आग्रा कॅनॉलच्या झुडपातून तरुणीचा मृतदेह सापडला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला आहेत. पोलिसांना या प्रकरणी पुरावे सापडले असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

पोलीस, हत्या आणि खलबत्ता, मुलीच्या नांदण्यावरुन कल्याणमध्ये जे घडलं त्यावर पोलीस दल हादरलं

रात्री नवरा अचानक घरी, पत्नी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत, एकही शब्द न बोलता नवऱ्याने…

16 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, सोलापुरात नराधम बापाला अटक, आईचीही साथ

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.