पोलीस, हत्या आणि खलबत्ता, मुलीच्या नांदण्यावरुन कल्याणमध्ये जे घडलं त्यावर पोलीस दल हादरलं

पोलीस, हत्या आणि खलबत्ता, मुलीच्या नांदण्यावरुन कल्याणमध्ये जे घडलं त्यावर पोलीस दल हादरलं
कल्याणमध्ये पत्नी-मुलीकडून पोलिसाची हत्या

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची हत्या करण्यात आली आहे. बोरसे यांच्या पत्नी आणि मुलीने हत्या केल्याचे उघड झाले आहे.

अमजद खान

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 07, 2022 | 12:41 PM


कल्याण : मुंबई पोलीस दलात कार्यरत कॉन्स्टेबलची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसाच्या पत्नी आणि मुलीनेच ही हत्या केल्याचा आरोप आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण कोळसेवाडी परिसरात हे हत्याकांड घडल्याचं उघडकीस आलं आहे. खलबत्त्याने ठेचून पोलिसाची हत्या करण्यात आली. मुलगी सासरी नांदत नसल्याच्या कारणावरुन कुटुंबात झालेल्या वादाचं पर्यवसन हत्येत झालं.

काय आहे प्रकरण?

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची हत्या करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौक हिरा पन्ना अपार्टमेंट येथे प्रकाश बोरसे हे आपली पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री सोबत राहत होते. बोरसे यांच्या पत्नी आणि मुलीने हत्या केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे खलबत्त्याने ठेचून दोघींकडून पित्याची हत्या करण्यात आली. भाग्यश्री हिचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते मात्र ती सासरी नांदत नसल्याने बोरसे यांच्या घरात नेहमी वाद होत होते त्यातूनच ही हत्या झाल्याचा आरोप आहे. दोघी मायलेकींना कोलशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

ठाणे जिल्ह्यातील कल्याण कोळसेवाडी परिसरात मायलेकीने बापाची हत्या केली. कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे कुर्ला पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. काल संध्याकाळी सात वाजता ते कामावरून घरी आले. त्यानंतर भांडण झाल्यावर दोघींनी मिळून बापाची हत्या केली. हल्ल्यात प्रकाश यांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूनंतर दोघी घराचा दरवाजा बंद करून एका बाजूला बसून होत्या. जवळपास चार तास दोघी घरात बसून होत्या.

याची माहिती कल्याण कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना मिळाली बशीर शेख यांनी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना केलं पोलिसांनी दरवाजा तोडून घरात शिरले. घरात प्रकाश यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाशेजारी या दोघी बसून होत्या. पोलिसांनी या दोघींना देखील ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे .

संबंधित बातम्या :

इंस्टावर फुलले प्रेम, प्रेयसीला घेण्यासाठी प्रियकर आला; पण, घडले भलतेच…

हाताला येईल त्या गोष्टीनं मुलाला बेदम मारहाण, अंगावर चटके, कोण आहेत ही जनावरं?

रात्री नवरा अचानक घरी, पत्नी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत, एकही शब्द न बोलता नवऱ्याने…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें