AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali Crime : किरकोळ वाद टोकाला गेला, मुलाच्या वाढदिवशीच पतीने जे केले ते भयंकर

पती-पत्नीचे पटत नव्हते, म्हणून पत्नी माहेरी राहत होती. एकुलत्या एक मुलाचा वाढदिवस असल्याने आई मुलासाठी घरी आली होती. मात्र पित्याने जे केले त्याने डोंबिवली पुन्हा हादरली.

Dombivali Crime : किरकोळ वाद टोकाला गेला, मुलाच्या वाढदिवशीच पतीने जे केले ते भयंकर
किरकोळ कारणातून पतीकडून पत्नी आणि मुलावर हल्ला
| Updated on: Aug 31, 2023 | 8:04 PM
Share

डोंबिवली / 31 ऑगस्ट 2023 : गुन्हेगारी घटनांनी कायम चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत आज पुन्हा एक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून पतीने मुलासह पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कदायक घटना डोंबिवलीतील म्हात्रे नगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी मुलाने रामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सुरेश सखाराम पैलकर असे आरोपी पतीचे नाव आहे. तर सूरज पैलकर असे मुलाचे आणि सुलोचना पैलकर असे पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी सुरेश आणि त्याची पत्नी सुलोचना यांचे एकमेकांशी पटत नव्हते. यामुळे सुलोचना गेली दोन वर्षे कर्नाटकमध्ये तिच्या आईच्या घरी राहत होती. सुलोचना हिचा 28 वर्षीय मुलगा सूरजचा बुधवारी वाढदिवस होता. यामुळे मुलाच्या वाढदिवसासाठी सुलोचना कर्नाटक येथून डोंबिवलीत आपल्या पतीच्या घरी आली होती. वाढदिवस साजरा केल्यानंतर रात्री 11 ते 11.30 च्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादामुळे संतापलेल्या सुरेशने किचनमधील चाकू घेऊन सुलोचनावर हल्ला केला.

मुलाकडून वडिलांविरोधात फिर्याद दाखल

आईवर हल्ला करताना पाहून सूरज आईला वाचवायला मध्ये पडला असता सुरेशने त्याच्यावरही हल्ला केला. तसेच सुरेशने आई आणि मुलाला दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. वडिलांकडून पुन्हा असा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेत सूरजने रामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. रामनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.