AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील क्राईमच्या महत्त्वाच्या घटना एका क्लिकवर

महाराष्ट्रात आज दिवसभरात घडलेल्या घटना फक्त एका क्लिकवर, शहापूर तालुक्यात रिक्षा चोरणारी सक्रीय झाली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांचे धाबे चांगलेचं दणाणले आहेत.

महाराष्ट्रातील क्राईमच्या महत्त्वाच्या घटना एका क्लिकवर
mumbai policeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 27, 2023 | 4:07 PM
Share

मुंबई : मुंबईच्या (mumbai crime news) सांताक्रुज परिसरातील गॅलेक्सी हॉटेलमध्ये दुपारी 1 वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती होती. मात्र आगीची माहिती मिळताच घटनास्थळी 4 अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या होत्या, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या (maharashtra crime news) जवानांनी शर्तीचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत 5 जण जखमी झाले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र सध्या आग आटोक्यात (fire news) आली पथक त्या परिसराची पाहणी करीत आहे.

रिक्षा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद

शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरात मोटारसायकल व रिक्षा चोरी करणारी टोळी सक्रिय झाली झाली आहे. त्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करित आहेत. खर्डी पोलिस स्टेशन हद्दीतून ६ मोटारसायकल व एक रिक्षा चोरीला गेली असल्याची उघडकीस आली आहे. राञीच्या सुमारास रिक्षा चोरी करीत असतानाचा व्हिडिओ सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. पोलीस तपास करत नसल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे.

सिन्नर आगाराच्या बसचे डिझेल चोरी करणारा चोरटा जेरबंद

निफाडच्या सायखेडा जवळील भेंडाळी येथे मुक्कामी असलेली सिन्नर आगाराच्या बस डिझेल टाकीतून चोरट्यांनी अंदाजे 90 लिटर डिझेल चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत बस चालकाने सायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपासाची सूत्रं फिरवत डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक करत न्यायालयात हजर केले होते. या चोरट्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीला अटक

लातुर पोलिसांनी अनेक जिल्ह्यातून मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीला अटक केली आहे. चोरट्यांच्या या टोळीकडून 12 मोटारसायकल आणि पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही टोळी लातुर, नांदेड आणि इतर जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करीत होती. विवेकानंद चौक पोलिसांनी प्रयत्न करून या टोळीचा छडा लावला आहे. या टोळीतील तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे.

२ लाख रुपये किमतीचे साहित्य आढळून आले

इगतपुरी तालुक्यातील आवळखेड शिवारातील डोंगर कपारीत गावठी दारू निर्माण करण्याचा मोठा अड्डा असल्याची गुप्त माहिती इगतपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी आपल्या पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला. त्यांना तेथे गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे ३८०० लिटर रसायनाचे १९ ड्रम, ४ मण जळाऊ लाकडासह सुमारे २ लाख रुपये किमतीचे साहित्य आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....