Kalyan Crime : कल्याणमध्ये पुन्हा हत्याकांड, आधी अल्पवयीन मुलाचे अपहरण केले, मग…

कल्याणमध्ये हत्येचे सत्र सुरुच आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा हत्याकांड घडले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Kalyan Crime : कल्याणमध्ये पुन्हा हत्याकांड, आधी अल्पवयीन मुलाचे अपहरण केले, मग...
संशयातून अल्पवयीन मुलाची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 1:44 PM

कल्याण / 19 ऑगस्ट 2023 : कल्याणमध्ये हत्येचे सत्र थांबताना दिसत नाही. दररोज काही ना काही कारणातून हत्येच्या घटना घडत आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्येची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलाच्या हत्येची घटना उघडकीस आली आहे. जुन्या वादातून 17 वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी मुलांच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित आणि आरोपींमध्ये जुना वाद होता. याच वादातून आरोपींनी गुरुवारी दुपारी मुलाचे कैलासनगर परिसरातून अपहरण केले. त्यानंतर आरोपी मुलाला खडेगोलवली परिसरात जंगलात घेऊन गेले. तेथे त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला.

पोलिसांनी मुलाची सुटका करुन रुग्णालयात नेले

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाची सुटका केली. त्याला उपचारासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईतील रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन ते चार जणांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भरदिवसा अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक आणि नागरिक करत आहेत.

Non Stop LIVE Update
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा.
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?.
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.