Navi Mumbai Crime : दुकानासमोर रिक्षा पार्क केल्याने दोघांमध्ये वाद झाला, मग भररस्त्यात रक्तरंजित खेळ

क्षुल्लक कारणातून दुकानदार आणि रिक्षा चालकामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि भररस्त्यात कहर झाला.

Navi Mumbai Crime : दुकानासमोर रिक्षा पार्क केल्याने दोघांमध्ये वाद झाला, मग भररस्त्यात रक्तरंजित खेळ
क्षुल्लक कारणातून दुकानदाराने रिक्षा चालकाला संपवले
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 11:09 AM

नवी मुंबई / 9 ऑगस्ट 2023 : दुकानासमोर रिक्षा पार्क केल्याच्या क्षुल्लक वादातून नवी मुंबईत रिक्षा चालकाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील तुर्भे येथे ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. दिनेश चव्हाण असे मयत रिक्षा चालकाचे नाव आहे, तर दिनेश मौर्या असे अटक आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाला होता. आरोपी आणि मयत एकाच परिसरातील असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. क्षुल्लक कारणातून हत्या केल्याने पोलीस चक्रावून गेले.

छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून हत्या

नवी मुंबईतीव तुर्भे येथे आरोपी दिनेश मौर्या याचे फर्निचरचे दुकान आहे. या दुकानासमोर मयत दिनेश चव्हाण याने रिक्षा पार्क केली होती. आपल्या दुकानासमोर रिक्षा लावल्याने आरोपीने रिक्षा चालकाला हटकले. यानंतर आरोपी आणि मयत यांच्यात वादावादी झाली. या वादातून आरोपीने पीडिताच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसला. यात रिक्षआ चालक गंभीर जखमी झाला. जखणी रिक्षा चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी दिनेश मौर्या याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. हत्येचे कारण पाहता पोलीसही चक्रावले.

हे सुद्धा वाचा

'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला.
"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा.
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.