AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनैतिक संबंधांवरुन पती दररोज मारहाण करायचा, अखेर प्रियकराच्या मदतीने पत्नीने ‘असा’ काढला काटा

लताच्या या प्रेमसंबंधांबाबत कुलदीपला माहिती मिळाली. या अनैतिक संबंधाला विरोध करत कुलदीप दररोज लताला मारहाण करायचा. यामुळे लताने आपला प्रियकर नरेंद्र यांनी मिळून कुलदीपला मार्गातून हटवण्याचा कट रचला.

अनैतिक संबंधांवरुन पती दररोज मारहाण करायचा, अखेर प्रियकराच्या मदतीने पत्नीने 'असा' काढला काटा
प्रियकराने विवाहित प्रेयसीला संपवलेImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 23, 2023 | 3:44 PM
Share

अमरोहा : अनैतिक संबंधांवरुन दररोज मारहाण करणाऱ्या पतीची पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे उघडकीस आली आहे. पतीच्या हत्येसाठी पत्नीने किलर्सना 2 लाखाची सुपारी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह चार जणांना अटक केली आहे. कुलदीप शर्मा असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मयत कुलदीप शर्मा हा पेशाने ट्रक ड्रायव्हर होता. हत्या केल्यानंतर आरोपींनी रस्त्याच्या कडेला मृतदेह फेकून पलायन केले. कुलदीपच्या पत्नीचे परिसरातील एका गॅस एजन्सीच्या मालकाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमाला पतीचा विरोध असल्याने महिलेने त्याचा काटा काढला.

कुलदीप शर्मा दुपारी अचानक घरातून गायब झाला. त्यानंतर रात्री कुलदीपचा मृतदेह एका तलावाजवळ पडल्याची माहिती दिली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी कुदीपची पत्नी लता शर्मासह अनेक नातेवाईकांची चौकशी केली. तपासादरम्यान पोलिसांना लताच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली. लताचे गॅस एजन्सीच्या मालकाशी प्रेमसंबंध होते. याच एजन्सीच्या ट्रकवर कुलदीप चालक होता.

लताच्या या प्रेमसंबंधांबाबत कुलदीपला माहिती मिळाली. या अनैतिक संबंधाला विरोध करत कुलदीप दररोज लताला मारहाण करायचा. यामुळे लताने आपला प्रियकर नरेंद्र यांनी मिळून कुलदीपला मार्गातून हटवण्याचा कट रचला.

यासाठी त्यांनी सुपारी किलर्सला 2 लाख रुपयाची सुपारी दिली. यापैकी 50 हजार रुपये अॅडव्हान्स दिले होते.

दर्यापूर तुगान गावातील रहिवासी ऋषीपाल, कासमपूर जुनुबी येथील रहिवासी विजय यांना ही सुपारी देण्यात आली होती.

काय घडले नक्की?

9 जानेवारी रोजी लताने कुलदीपला ट्रक खरेदीच्या बहाण्याने गजरौला येथे पाठवले. रस्त्यात त्याला कपिल, ऋषीपाल आणि विजय भेटले. ऋषीपाल आणि विजय कुलदीपसोबत गाडीत बसले. कपिल बाईकवर होता. उझरी येथे दारू पिऊन परतत असताना ऋषीपालने सैदंगळी लिंक रोडवर कार वळवली.

रस्त्यात कुलदीपची कारने चिरडून हत्या केली. यानंतर कुलदीपच्या अंगावर बाईकही घातली. हत्या करुन अपघात झाल्याचे भासवण्यासाठी मृतदेह उझरी मार्गावरील नवादा पुल्याजवळ फेकून दिला.

पोलिसांना लतावर संशय होता. पोलीस तिच्या हालचालींवर नजर ठेवून होती. तिचे कॉल डिटेल्सही काढले. या आधारे पोलिसांनी लता शर्मा, नरेंद्र, कपिल नागर आणि ऋषिपाल यांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली बाईकही जप्त केली आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.