AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या IPS सौरभ त्रिपाठींच्या काळात कोपर्डीची घटना घडली, ते खंडणी प्रकरणात अखेर सस्पेंड, मुंबईचं प्रकरण भोवलं !

सौरभ त्रिपाठी आता एका दुसऱ्या प्रकरणात सस्पेंड झाले आहेत. त्रिपाठींवरील आरोपही तेवढाच गंभीर आहे. व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याच्या (extortion) आरोपात त्यांना गृह विभागाने निलंबित केले आहे.

ज्या IPS सौरभ त्रिपाठींच्या काळात कोपर्डीची घटना घडली, ते खंडणी प्रकरणात अखेर सस्पेंड, मुंबईचं प्रकरण भोवलं !
आयपीएस सौरभ त्रिपाठी फरारImage Credit source: free press journal
| Updated on: Mar 23, 2022 | 3:40 PM
Share

मुंबई : कोपर्डीच्या (Kopardi Case) घटनेच्या जखमा आजही महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणतात. कोपर्डी अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला होता. आज पुन्हा त्या घटनेची आठवण येण्याचे कारण म्हणजे एक पोलीस अधिकारी जो मुंबईत निलंबित झाला आहे. हे प्रकरण ज्या वेळी घडलं त्यावेळी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी (IPS Sourabh Tripathi) त्या ठिकाणी पोस्टिंगला होते. तेच सौरभ त्रिपाठी आता एका दुसऱ्या प्रकरणात सस्पेंड झाले आहेत. त्रिपाठींवरील आरोपही तेवढाच गंभीर आहे. व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याच्या (extortion) आरोपात त्यांना गृह विभागाने निलंबित केले आहे. तसेच त्रिपाठी यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अंगडिया व्यावसायिकाकडून त्रिपाठी यांनी 10 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार प्राथमिक तपासात पुढे आला आहे. यात फक्त त्रिपाठी यांच्यावरच गुन्हा दाखल नाही झाला तर इतरही तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांचाही समावेश आहे.

कारवाईची कुणकुण लागताच त्रिपाठी गायब

आपल्याविरोधात कारवाई होणार हे ज्यावेळी त्रिपाठी यांच्या लक्षात आले, तेव्हापासून त्रिपाठी ड्युटीवर न जाता गायब असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. या प्रकरणी इतर तीन अधिकाऱ्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून ते कोठडीत आहेत. 18 फेब्रुवारी रोजी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात तीन पोलिस कर्मचार्‍यांवर एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिस उपायुक्त त्रिपाठी गायब झाले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने त्यांचा शोध घेतला मात्र त्रिपाठी हाती लागले नाहीत. रविवारी पोलिसांनी लखनौ येथील त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराला अटक केली, ज्याच्याकडे त्रिपाठीने हवालामार्गे 40 लाख रुपये पाठवले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

अंगडियांना बेकायदेशीरपणे अटक करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यामागे त्रिपाठीचा ब्रेन होता. निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे, हे देखील लक्षात आले आहे की त्रिपाठी साक्षीदारांवर दबाव आणत आहेत. अंगडियांनी डिसेंबर 2021 मध्ये दाखल केलेल्या त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की झोन ​​2 चे प्रमुख असलेले DCP त्रिपाठी यांनी त्यांचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती. पोलीस अधिकार्‍यांनी अंगडियांना पोलीस चौकीत आणून बॅगेतील रोकड जबरदस्तीने हिसकावून घेण्यास सुरुवात केली, तेव्हा अंगडियांनी त्रिपाठी यांची भेट घेऊन तक्रार केली. मात्र त्रिपाठी यांनी स्वत: महिन्याला 10 लाख रुपयांची मागणी केली. तसेच धमकी दिली की पैसे द्या अन्यथा, ते आयकर विभागाला कळवतील आणि अंगडियांना त्यांचा व्यवसाय करू देणार नाही. याच प्रकरणात आता त्रिपाठीचा पाय खोलात गेला आहे.

मृत्यूआधीची 3 सेकंद! तोल गेला, मागून येणाऱ्या कंटेनरच्या चाकाखाली डोकं येऊन दोघंही जागीच खल्लास

Honey Trap | मिस्टर राजस्थान हनी ट्रॅपच्या जाळ्यात, 20 लाख उकळताना डान्सर रंगेहाथ अटक

Nalasopara | सिलिंग कोसळल्याने एकाच कुटुंबातील चौघे जखमी, दाम्पत्यासह दोन मुलं गंभीर

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.