Nalasopara | सिलिंग कोसळल्याने एकाच कुटुंबातील चौघे जखमी, दाम्पत्यासह दोन मुलं गंभीर

नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर परिसरातील जय कृष्णा सोसायटीमधील तिसरा मजला रुम नंबर 301 मध्ये मध्यरात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली आहे.

Nalasopara | सिलिंग कोसळल्याने एकाच कुटुंबातील चौघे जखमी, दाम्पत्यासह दोन मुलं गंभीर
नालासोपाऱ्यात सिलिंग कोसळून चौघं जखमीImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 2:22 PM

नालासोपारा : मुंबईजवळच्या नालासोपारा (Nalasopara) भागात घरातील खोलीचे सिलिंग (Ceiling) कोसळल्याने एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाले आहेत. जाधव पती-पत्नीसह त्यांची दोन मुलं गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. प्रशांत जाधव (वय 47 वर्ष), त्यांची पत्नी आकांक्षा जाधव (वय 37 वर्ष) असं जखमी झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे. प्रशांत यांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याने त्यांना मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर परिसरातील जय कृष्णा सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावरील रुम नंबर 301 मध्ये मंगळवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. सिलिंग कोसळल्यानंतर झालेल्या आरडाओरडा ऐकून शेजारच्या रहिवाशांनी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नेमकं काय घडलं?

नालासोपारा शहरातील एका घरात खोलीचे छत कोसळून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाले आहेत. नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर परिसरातील जय कृष्णा सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावरील रुम नंबर 301 मध्ये मंगळवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

कुटुंबातील चौघे गंभीर जखमी

प्रशांत जाधव (वय 47 वर्ष), त्यांची पत्नी आकांक्षा जाधव (वय 37 वर्ष) असं जखमी झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे. त्यांची दोन मुलंही गंभीर आहेत. प्रशांत यांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याने त्यांना मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सिलिंग कोसळल्यानंतर कुटुंबात एकच गोंधळ उडाला. चौघांचा आरडाओरडा ऐकून शेजारच्या रहिवाशांनी तात्काळ घरात धाव घेतली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही.

संबंधित बातम्या :

मित्रांसोबत पोहायला गेला, पण परतलाच नाही; पुण्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू

तरुणानं प्रसंगावधान राखत वृद्ध दाम्पत्याला वाचवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगरात रिक्षा-टेम्पोची जोरदार धडक, काचा चेहऱ्यात घुसल्याने रिक्षाचालक जखमी

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.