जालन्यात पोलिसांची धडाकेबाज कारवाई, बँकेत घुसून पिस्तूलीचा धाक दाखवणारे दरोडेखोर अखेर जेरबंद, वाचा थरार

जालन्यात बुलडाणा अर्बन बँकेत दरोडा टाकणाऱ्या तीन दरोडेखोरांपैकी दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. विशेष म्हणजे या कारवाईतून पोलिसांना कोट्यवधींचा मुद्देमाल मिळाला आहे.

जालन्यात पोलिसांची धडाकेबाज कारवाई, बँकेत घुसून पिस्तूलीचा धाक दाखवणारे दरोडेखोर अखेर जेरबंद, वाचा थरार
जालन्यात पोलिसांची धडाकेबाज कारवाई, बँकेत घुसून पिस्तूलीचा धाक दाखवणारे दरोडेखोर अखेर जेरबंद, वाचा थरार
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 7:52 PM

जालना : जालन्यात दोन दिवसांपूर्वी बुलडाणा अर्बन बँकेवर भर दिवसा मोठा दरोडा पडला होता. दुपारच्या वेळी बँकेचं कामकाज सुरु असताना तीन दरोडेखोर बँकेत शिरले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत 23 लाख 87 हजार 960 रुपयांची रोख रक्कम पळवून नेली होती. यासोबतच कर्जदारांनी तारण ठेवलेले 3 कोटी 42 लाख 17 हजार 711 रुपये किंमतीचे सोने चोरट्यांनी लांबविले होते. पण त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलंय. पोलिसांच्या या कारवाईवर स्थानिकांकडून कौतुक केलं जातंय. या कारवाईबाबत पोलिसांनी प्रसिद्धी पत्रक जारी करत माहिती दिली आहे.

दरोड्यात नेमकी कितीची लुट झाली ते आज स्पष्ट

जालना जिल्ह्यातील बुलडाणा अर्बन बँकेवर शहागड येथे गुरुवारी तीन दरोडेखोरांनी दरोडा टाकत मोठी लुट केली होती होती. जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंदी पोलिसांनी तीन दरोडेखोरांपैकी दोन जणांना 24 तासात अटक केलीय. पण या दरोड्यात कितीची लुट झाली हे आज स्पष्ट झाले. बुलडाणा अर्बन बँकमधून दरोडेखोरांनी तब्बल 23 लाख 87 हजार 960 रुपये रोख आणि 3 कोटी 42 लाख 17 हजार 711 रुपये किंमतीचे कर्जदारांनी तारण ठेवलेले सोने लंपास केले होते. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल दरोडेखोरांकडून जप्त केला आहे.

तीन दरोडेखोरांपैकी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मुकीद उर्फ मुसताफ कासम आणि माजलगाव तालुक्यातील संदीप बबन सोळंके या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दरोड्यातील दोघांकडून 9 लाख 50 हजार रुपये रोख आणि 3 कोटी 42 लाख 17 हजार 711 रुपये असा एकूण 3 कोटी 51 लाख 67 हजार 711 असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींच्या दरोड्यांचा थरार वाचा

तीन आरोपी तोंडाला रुमाल बांधून आतमध्ये शिरले होते. यावेळी त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांसमोर थेट बंदूक उगारली. त्यामुळे कर्मचारी घाबरले. आरोपी जोरजोरात ओरडत कॅश काउन्टरजवळ आले. त्यांनी कॅशिअरवरही बंदूक रोखली. त्यानंतर त्यांनी लाखोंची रोकड लंपास केली. यासोबत दरोडेखोरांनी बँकेतील काही लॉकर फोडले. त्यांनी लॉकरमधील सोन्याचे दागिने देखील पळवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दरोड्याची माहिती मिळताच काही खातेदारांनी बँकेबाहेर गर्दी केली होती.

महाराष्ट्रात दहा दिवसांत चार बँकांमध्ये दरोडा

विशेष म्हणजे महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांमध्ये बँकेवर दरोड्याच्या आतापर्यंत चार घटना समोर आल्या आहेत. दरोड्याची पहिली घटना ही पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे महाराष्ट्र बँकेत 21 ऑक्टोबरला दरोड्याची घटना घडली होती. पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील 31 लाख रुपये रोकड तसेच 2 कोटी रुपयांचे सोने पळवून नेले होते.

बँकेवरील दरोड्याची दुसरी घटना ही जालना जिल्ह्यातून समोर आली होती. जालनाच्या अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलडाणा अर्बन बँकेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडला होता. आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँकेतील पैसे आणि लॉकरमधील दागिने लंपास केले होते. संबंधित घटना ही 28 ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास घडली होती. तीन बंदूकधारे बँकेत शिरले. त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत 25 लाख रुपये आणि मोठ्या प्रमाणावर लॉकरमधील सोने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

तिसरी घटना ही काल (29 ऑक्टोबर) सोलापुरात घडली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये सात लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. गॅस कटरच्या सहाय्याने दरवाजा तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे. तर तिसरी घटना ही आज सकाळी बुलडाण्यात स्टेट बँकेत घडलीय.

संबंधित बातमी :

चोरांचा दरोड्याचा नवा पॅटर्न? आता बुलडाण्यात स्टेट बँकेवर दरोडा, 20 लाखांची रोकड लंपास, महाराष्ट्रात 10 दिवसांत 4 बँकांना लक्ष्य

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.