AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगी असल्याचं भासवलं, प्रेयसीच्या नवऱ्याशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून हत्या

मुकेश पंडित हा दोघांनाही त्यांच्या रस्त्यातील काटा वाटू लागला. त्यामुळे त्याला वाटेतून दूर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उज्ज्वल आणि नीलम या दोघांनीही मुकेशची हत्या करण्याचं ठरवलं.

मुलगी असल्याचं भासवलं, प्रेयसीच्या नवऱ्याशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून हत्या
गुजराती ड्रामा अर्टिस्ट प्राची मौर्य हत्या प्रकरणी बॉयफ्रेंडला जन्मठेपेची शिक्षाImage Credit source: टीव्ही9
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 04, 2022 | 2:02 PM
Share

रांची : प्रियकराने प्रेयसीच्या पतीची हत्या (Girlfriend’s Husband killed) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झारखंडमधील धनबादमध्ये हा प्रकार घडला आहे. पान मसाला व्यापारी मुकेश पंडित (Mukesh Pandit Murder) यांची 26 मार्च रोजी हत्या करण्यात आली होती. गोळी झाडून त्यांचा खून करण्यात आला होता. धनबाद पोलिसांनी या प्रकरणाचे गूढ उकलले आहे. मुकेश यांची पत्नी नीलम देवी आणि तिचा प्रियकर उज्ज्वल शर्मा यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फेसबुकवर मुलीच्या नावे अकाऊण्ट ओपन करत पंडित यांना उज्ज्वलने भेटायला बोलावरले होते. त्यानंतर गोळी झाडून त्यांची हत्या (Jharkhand Crime) केली. उज्ज्वलकडून पोलिसांनी पिस्तूल आणि मुकेश पंडित यांचा मोबाईल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

काय आहे प्रकरण?

मुकेश पंडित यांच्या घराजवळच उज्ज्वल शर्माचं घर होतं. उज्ज्वल त्यांच्या दुकानात काम करत होता. त्यामुळेच पंडित यांच्या घरी उज्ज्वलचं येणं-जाणं वाढलं. दरम्यानच्या काळात उज्ज्वल आणि नीलम देवी यांची ओळख वाढली. त्याचं रुपांतर प्रेमात झालं. मुकेश पंडित यांच्या कानामागे दोघांचं प्रेम प्रकरण सुरु होतं.

प्रेम-प्रकरणात काटा

मुकेश पंडित हा दोघांनाही त्यांच्या रस्त्यातील काटा वाटू लागला. त्यामुळे त्याला वाटेतून दूर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उज्ज्वल आणि नीलम या दोघांनीही मुकेशची हत्या करण्याचं ठरवलं.

मुलीच्या नावाने फेसबुक अकाऊण्ट

उज्ज्वल शर्माने मुलीच्या नावाने फेसबुक अकाऊण्ट तयार केलं. मुकेश पंडित यांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. त्यांनी ती स्वीकारताच त्यांच्याशी मेसेंजरवर चॅटिंगला सुरुवात केली. हळूहळू मैत्री वाढवून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. 25 मार्चच्या रात्री उज्ज्वलने मुकेश यांना मेसेज करुन भेटायला बोलावलं. दामोदरपूर फुटबॉल ग्राऊण्डवर भेट झाल्यानंतर त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली.

संबंधित बातम्या :

बाजारात गेलेला नवरा परतलाच नाही, दुसऱ्या दिवशी रस्त्यात मृतदेह आढळला

माझ्या जवळ का येतोस, पत्नीने चापट मारली, पतीने जीव घेतला

फेब्रुवारीत शून्य हत्या, नागपूर पोलिसांनी पाठ थोपटली, मार्चमध्ये दहा हत्याकांड

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...