AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहा दिवसांपूर्वीच जेलमधून सुटका, पुन्हा ट्रेनमध्ये दरोड्याची तयारी, कल्याण रेल्वे पोलिसांकडून चौघांना बेड्या

कुशीनगर एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना (Kalyan Railway Police) कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर पोलीस पाचव्या आरोपीच्या शोधात आहेत.

दहा दिवसांपूर्वीच जेलमधून सुटका, पुन्हा ट्रेनमध्ये दरोड्याची तयारी, कल्याण रेल्वे पोलिसांकडून चौघांना बेड्या
Kalyan crime News
| Edited By: | Updated on: May 21, 2021 | 12:17 PM
Share

कल्याण : कुशीनगर एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना (Kalyan Railway Police) कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर पोलीस पाचव्या आरोपीच्या शोधात आहेत. विशेष म्हणजे या पाचही दरोडेखोरांची दहा दिवसापूर्वीच जेलमधून जामीनावर सुटका झाली होती. सुटून आल्यावर अवघ्या दहा दिवसांनी पुन्हा दरोडे टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला आहे (Kalyan Railway Police Arrested Four Robbers Who Try To Robber In Train Who Release On Bail Before 10 Days).

नेमकं काय घडलं?

कल्याण-इगतपूरी दरम्यान अनेकदा लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांना लूटण्याच्या घटना घडलेल्या आहेत. कल्याण रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली की, काही जण 3 मे रोजीच्या पहाटे उत्तर भारताकडे जाणाऱ्या कुशीनगर एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना लूटण्याच्या बेतात आहेत. हे पाचही जण कसाऱ्याच्या अलीकडे एका आरोबी जवळ जमणार आहेत. ज्या ठिकाणी गाडी स्लो होते. त्याठिकाणाहून हे गाडीत चढून प्रवाशांना लूटणार आहे. ही खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला.

त्यानंतर पोलिसांचे एक पथक कसारा स्थानकाच्या दिशने रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार पाचही जण पोलिसांना दिसले. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. मात्र, अंधाराचा फायदा घेत पाचवा आरोपी पळून गेला. अटक आरोपींची नावे प्रकाश सेवक, शंकर शहा, धनंजय शुक्ला, रईस शेख अशी आहेत.  इम्रान खान हा आरोपी सध्या फरार आहे.

याबाबत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक अर्चना दुसाणे यांचे म्हणणे आहे की, हे चौघे आणि फरार असलेला आरोपी हे सराईत गुन्हेगार आहे. दहा दिवसांपूर्वीच एका चोरीच्या प्रकरणात या पाचही जणांची जेलमधून जामीनावर सुटका झाली होती. कुशीनगर एक्सप्रेसमध्ये हे पाचही जण प्रवाशांना लूटण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच आम्ही सापळा रचून चार जणांना अटक केली आहे. पाचव्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Kalyan Railway Police Arrested Four Robbers Who Try To Robber In Train Who Release On Bail Before 10 Days

संबंधित बातम्या :

उन्हाळ्यात मुख्य दार उघडं ठेवून झोपताय? चोरांनी मोबाईल-टीव्हीसह घर धुवून नेलं

प्रेयसी, तिची बहीण, आईला जीवे मारलं, सेशन कोर्टाकडून जन्मठेप, आरोपीची हायकोर्टात धाव, न्यायाधीशांनी झापलं

VIDEO | बायकोसमोर शाईनिंग, लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापला, नवरोबाला बेड्या

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.