Crime News : तर तुझी बायको माझ्या घरी आणून सोड… सावकाराचे काळजाला घाव घालणारे बोल ! व्यावसायिकाने थेट..
सावकाराच्या जाचाला कंटाळून बीडमधील एका कापड व्यावसायिकाने भयानक पाऊल उचललं. सावकाराने पत्नीला आपल्या घरी सोडण्याची धमकी दिली होती. पैसे देऊनही सतत जाच होत असल्याचे व्यापाऱ्याने अखेर टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी सावकार आणि त्याच्या पत्नीसह सात जणांवर गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना अटक झाली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून बीडमधील गुन्ह्याच्या अनेक घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. आता त्याच बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. सतत होणारा सावकारी जाच आणि त्याच सावकाराने पत्नीसंदर्भात दिलेली धमकी या सर्व गोष्टींना वैतागून बीडमध्ये एका कापड व्यावसायिकाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे, (उधार घेतलेले) पैसे वेळेवर आणून देता येत नसतील, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, अशी भयानक धमकी सावकाराने त्या मृत व्यापाऱ्याला दिली होती. त्याच जाचाला कंटाळून दुसऱ्याच दिवशी कपडा व्यावसायिकाने गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं. राम फटाले असे मृत व्यावसायिकाचेनाव असून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याचे आई-वडीव, पत्नी, मुलं आणि कुटुंबियांवर तर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी याप्रकरणी रामच्या वडिलांनी, दिलीप फटाले यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार, पेठ बीड पोलीस ठाण्यात सावकार डॉ. लक्ष्मण जाधव आणि त्याच्या पत्नीसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे, पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मृत्यूपूर्वी राम यांनी चार पानी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.
तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड.. सावकाराने थेट दिली धमकी
मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत राम फटाले हे कापड व्यावसायित रहात होते. त्यांच्यासह आई-वडील, पत्नी, मुलं तसेच फटाले यांचे भाऊ-कुटंबं हेही तिथेच रहात होते. राम यांनी 7 वर्षांपूर्वी डॉ. जाधव यांच्याकडून अडील लाख ( 2 लाख 50 हजार) रुपयांचे कर्ज दहा टक्के व्याजानेघेतले होते. त्यांनी या कर्जाची परतफेड देखील 25 हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे केली होती. मात्र पैसे परत दिल्यानंतरही जाधव यांचा सावकारी जाच कमी होत नव्हता.
मात्र पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता. तुझ्याकडून वेळेवर पैसे देणं होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड.. असे म्हणत सावकाराने मानसिक छळ केला. वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राम फटाले यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. राम व त्यांच्या वडिलांनी सह्या करून दिलेले बँकेचे चेकही ते परत करत नव्हते.
4 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता सर्वजण घरी असतानाच डॉ. लक्ष्मण जाधव व त्यांची पत्नी वर्षा जाधव हे घरी आले आणि रामशी बोलू लागले. तुला वेळेवर पैसे देणं जमत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, अशी घाणेरही धमकी देत जाधव यांनी राम यांचा मानसिक छळ केला, असे रामच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केलं. डॉ. जाधव यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या छळाला वैतागून 6 जुलै रोजी सकाळी राम यांनी गळफास लावू घेत आत्महत्या केली आणि आयुष्य संपवलं. त्याआधी त्यांनी 4 पानी लुलाईड नोटही लिहीली.
राम यांच्या वडिलांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर पेठ बीड पोलीस ठाण्यात सावकार डॉ. लक्ष्मण जाधव आणि त्याच्या पत्नीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल असून तीन जण अटकेत आहेत. उर्वरित फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक रवाना केले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे यातील मुख्य आरोपी डॉ.लक्ष्मण जाधव हा भाजपाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
