AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम विवाहाचा राग, पित्याकडून पोटच्या मुलीची बलात्कार करुन हत्या, आता जावयाने आयुष्य संपवलं

भोपाळमधील रतीबाद भागातील समसगडच्या जंगलात मुकेशच्या पत्नीचा मृतदेह सापडला होता. पत्नीची हत्या आणि मुलाचा मृत्यू झाल्यापासून मुकेश हा मानसिक धक्क्यात आणि नैराश्यात असल्याचे कुटुंबीयांच्या चौकशीत समोर आले आहे.

प्रेम विवाहाचा राग, पित्याकडून पोटच्या मुलीची बलात्कार करुन हत्या, आता जावयाने आयुष्य संपवलं
क्राईम
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 11:33 AM
Share

भोपाळ : मध्य प्रदेशातील सिहोर येथील एका प्रेमकथेचा दुःखद अंत पाहायला मिळत आहे. भोपाळच्या रतीबाद भागात वडिलांनी पोटच्या विवाहित मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. तिच्या पोटातील गर्भही जवळच मृतावस्थेत आढळला होता. त्यानंतर विवाहितेच्या पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संपूर्ण कुटुंब संपल्याने एका प्रेम कहाणीचीही करुण अखेर झाली आहे.

काय आहे प्रकरण?

सीहोरचे एसएसपी समीर यादव यांनी सांगितले की, ‘इच्छावर पोलिस स्टेशनला माहिती मिळाली होती की, कालापिपल जागीर गावात राहणाऱ्या 21 वर्षीय मुकेश विश्वकर्माने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

दीड वर्षांपूर्वी प्रेम विवाह

प्राथमिक तपासात त्याने दीड वर्षांपूर्वी बिल्किसगंज गावात राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेम विवाह केला होता, असे समोर आले आहे. मुकेश कामानिमित्त रायपूरला गेला होता. त्यावेळी भोपाळमधील रतीबाद भागातील समसगडच्या जंगलात मुकेशच्या पत्नीचा मृतदेह सापडला होता. पत्नीची हत्या आणि मुलाचा मृत्यू झाल्यापासून मुकेश हा मानसिक धक्क्यात आणि नैराश्यात असल्याचे कुटुंबीयांच्या चौकशीत समोर आले आहे.

या प्रकरणी मुकेशची सासुरवाडी अर्थात विवाहितेच्या माहेरच्या मंडळींवरच मुलीच्या हत्येचा आरोप आहे. मुकेश दुसऱ्या जातीतील असल्यामुळे मुलीच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हते.

वडिलांकडून मुलीची हत्या

समसगडच्या जंगलात एक महिला आणि तिच्या लहानग्या मुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती रतीबाद पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासात महिलेची हत्या तिच्या वडिलांनीच केल्याचे निष्पन्न झाले. प्रेम विवाह केल्याचा राग आल्याने वडिलांनी मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिलेल्या जबानीत दिली होती. या प्रकरणी तिचे वडील आणि भाऊ या दोघांना आधीच अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

“हॅलो पोलीस स्टेशन? माझा बॉयफ्रेण्ड माझ्याशी बोलत नाहीये” व्याकुळ प्रेयसीला पोलिसांचं उत्तर काय?

बिर्याणीच्या दुकानात 16 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, अंबरनाथमध्ये खळबळ

24 वर्षीय पुतण्या नवविवाहित काकीच्या प्रेमात, दोघं घरातून रफूचक्कर, काका म्हणतो मी तिला एकदाच…

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.