फोनवर कोणाशी बोलतेयस? वहिनीने उत्तर नाही दिलं, चिडलेल्या दिराकडून गळा चिरुन खून

जेव्हा रोशनी वहिनी मोबाईलवर बोलत असलेल्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला, तेव्हा राजाने तिची हत्या केली. जेव्हा पोलिस आरोपीच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली

फोनवर कोणाशी बोलतेयस? वहिनीने उत्तर नाही दिलं, चिडलेल्या दिराकडून गळा चिरुन खून
crime News

भोपाळ : फोनवर कोणाशी बोलतेय, हे सांगण्यास नकार दिल्याने दिराने वहिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात हा प्रकार घडला. 30 वर्षीय तरुणाने रागाच्या भरात विवाहित महिलेची विळ्याने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

जबलपूरमधील हनुमंतल पोलिस ठाण्याचे निरीक्षक उमेश गोलानी यांनी सांगितले की, भंतालिया परिसरातील रहिवासी असलेला आरोपी राजा चक्रवर्ती विळा घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला, तेव्हा ही बाब उघडकीस आली. मी माझ्या भावाची पत्नी रोशनी (32) हिचा गळा चिरला, अशी कबुली त्यानेच दिली. रोशनी कोणाशी तरी फोनवर बोलत असताना ही घटना घडली.

फोनवर कोणाशी बोलतेयस? वहिनीने उत्तर नाही दिलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची वहिनी रोशनी मोबाईलवर बोलत होती. तू कोणाशी बोलत आहेस, असं दिराने विचारलं असता, तिने समोरच्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला, तेव्हा राजाने चिडून रागाच्या भरात तिची हत्या केली. जेव्हा पोलिस आरोपीच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या मानेवर जखमेच्या खुणा आढळल्या, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपीची चौकशी सुरु

मयत महिलेचा पती, मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य घटनेच्या वेळी घरात नव्हते. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीचीही चौकशी सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

भाजप पदाधिकारी अमोल इघे हत्या प्रकरण, संशयित आरोपी महिन्याभरापूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत?

मास्तराच्या घरावर आयटीचा छापा, सोनं संपत्ती बघून अधिकारीही चक्रावले

शाळेतच शिक्षिकेचा विनयभंग करुन अश्लील कृत्य, विज्ञानाच्या शिक्षकाला अटक

Published On - 3:21 pm, Fri, 26 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI