आत्महत्या केलेल्या मुलीला पुरुन बेपत्ता असल्याचा कांगावा, आई-वडिलांचा बनाव दहा वर्षांनी उघड

दहा वर्षांपूर्वी एका मुलीच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह पुरुन ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती.

आत्महत्या केलेल्या मुलीला पुरुन बेपत्ता असल्याचा कांगावा, आई-वडिलांचा बनाव दहा वर्षांनी उघड
Crime-News

भोपाळ : मध्य प्रदेश सरकार सध्या बेपत्ता असलेल्या मुलींना शोधण्यासाठी शोध मोहिम राबवत आहेत (Daughter Buried And Reported Missing). यादरम्यान, मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यातील पोलिसांनी एक धक्कादायक घटनेचा भांडोफोड केला आहे. इथे दहा वर्षांपूर्वी एका मुलीच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह पुरुन ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. या मुलीने आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला पुरलं (Daughter Buried And Reported Missing).

याप्रकरणाच्या तब्बल दहा वर्षांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा भांडोफोड केला. पोलिसांनी एका कब्रिस्तानात खोदकाम करवलं तेव्हा त्या मुलीचा पुरलेल्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले. या अवशेषांना भोपाळमध्ये टेस्टसाठी पाठवण्यात आलं. त्यानंतर याचा अहवाल आला. पोलिसांनी याप्रकरणी पित्यासह चौघांना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

2011 मध्ये ग्राम मनखेडा येथील राहणारी इकराम नावाची 17 वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. बेपत्ता असलेल्या मुलीला शोधण्यादरम्यान पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना चौकशीसाठी ठाण्यात बोलावलं. तेव्हा यांनी प्रकरण संपवण्याचं पोलिसांना म्हटलं. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांच्याकडे आणि नातेवाईकांकडे चौकशी केली. सुरुवातीला या आई-वडिलांनी काहीही सांगितलं नाही. पण, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सर्व हकिगत सांगितली.

इकरामने विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह मुडला खुर्द येथील कब्रिस्तानात रात्रीच्या वेळी पुरण्यात आला. नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे मंडी पोलिसांनी प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टरांच्या मदतीने मुडला खुर्द कब्रिस्तानात जेसीबीने खोदलं. तेव्हा येथे एक मृतदेह पुरलेला आढळून आला. त्या मृतदेहाचे काही अवशेष पोलिसांनी भोपाळच्या मेडिकल कॉलेजला टेस्टसाठी पाठवण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक काळापासून ही प्रकरणं प्रलंबित होती. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनंतर जुन्या प्रकरणातील बेपत्ता मुलींचा शोध सुरु झाला. पोलीस अधिक्षकांच्या आदेशांनंतर हे प्रकरणा ठाण्यात सर्वात प्रलंबित प्रकरण होतं त्यामुळे याकडे जास्त लक्ष देण्यात आलं. मुलीच्या आई-वडिलांना दोन-तीनवेळा चौकशीसाठी बोलावण्यात आलं. यादरम्यान, घरचे लोक काही गंभीर माहिती लपवत असल्याचं पुढे आलं (Daughter Buried And Reported Missing).

2011 मध्ये हे प्रकरण घडलं होतं. ही मुलगी बेपत्ता झाल्यावरही शेजारच्या दोन लोकांच्या संपर्कात होत्या. ती तिच्या घरुन दोन ते तीनवेळा बेपत्ता झाली होती. दुसऱ्यांना बेपत्ता झाल्यावर ती भोपाळ येथे आढळून आली होती. त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला समजावलं आणि तिच्या आईने तिच्या कानशीलातही लगावली. तेव्हा तिने दोन तरुणांची नावं सांगितली. या दोघांचं तिच्या घरी येणं-जाणं होतं. त्यानंतर मुलीला घरी आणण्यात आलं. मुलीने भावनांच्या भोवऱ्यात अडकून किंवा जाचाला कंटाळून घरातील सल्फासची गोळी खाल्ली. तेव्हा घरच्यांची त्या दोन तरुणांना घरी बोलावलं आणि सांगितलं की त्यांच्यामुळे मुलीने जीव दिला. तिच्या मृत्यूने खूप बदनामी होईल. त्यामुळे या लोकांनी मिळून तिचा मृतदेह पुरला. हे प्रकरण लपवण्यासाठी त्यांनी पोलिसांत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. ती यापूर्वीही अनेकदा बेपत्ता झाली असल्याने गावकऱ्यांनीही यावर विश्वास केला. मात्र, अखेर दहा वर्षांनी पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलं.

Daughter Buried And Reported Missing

संबंधित बातम्या :

अवघ्या 400 रुपयांसाठी दोन मित्रांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू, थरार सीसीटीव्हीत कैद

खळबळजनक, साताऱ्यात 150 फूट खोल दरीत बेपत्ता ट्रकचालकाचा मृतदेह आढळला

अहमदनगरच्या व्यावसायिकाला फेसबूकवरील मैत्री महागात, तब्बल 14 लाखांना बसला गंडा

नरेंद्र मोदींच्या भावाच्या नावाचा वापर करुन पैसे उकळले, यूपी पोलिसांकडून एकाला अटक

Published On - 3:11 pm, Wed, 3 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI